माजी विद्यार्थीचं अमृतवाहिनीचे खरे ‘ब्रँड अँबेसेडर’ - शरयू देशमुख

संगमनेर Live
0
माजी विद्यार्थीचं अमृतवाहिनीचे खरे ‘ब्रँड अँबेसेडर’ - शरयू देशमुख

◻️अमृतवाहिनी अभियांत्रिकीचा माजी विद्यार्थी मेळावा पुणे येथे उत्साहात संपन्न


संगमनेर LIVE | “माजी विद्यार्थीचं अमृतवाहिनीचे खरे ‘ब्रँड अँबेसेडर’ आहेत आणि या माजी विद्यार्थ्याच्या कर्तृत्वामुळे आणि आपापल्या क्षेत्रातील यशस्वी भरारीमुळेच अमृतवाहिनीचे नाव अत्यूच्य शिखरावर पोहोचले आहे. मागील ४२ वर्षामध्ये अमृतवाहिनी महाविद्यालयाने गुणवत्ता जपून विविध मानांकने तसेच ऑटोनॉमस स्टेटस मिळवले आहे. 

माजी विद्यार्थी, औद्योगिक क्षेत्र यांच्या सहभागाने महाविद्यालयातील उपक्रमांना मदत होणार आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात नेहमीच माजी विद्यार्थ्याच्या योगदानाबद्दल कौतुक करत असतात” असे प्रतिपादन अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. शरयू देशमुख यांनी केले. 

संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा ‘मिलाप २०२५, शनिवार दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पुणे येथील रागा पॅलेस येथे थाटामाटात संपन्न झाला. प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश, संस्थेचे डायरेक्टर अकॅडमीक्स डॉ. जे. बी. गुरव, माजी विद्यार्थी, व्हर्लपूलचे संचालक प्रफुल्ल गांधी, जग्वार अँड लॅन्ड रोवर पुणेचे पुरवठा साखळी व्यवस्थापन प्रमुख उत्तम गायकवाड, मॅनेजिंग पार्टनर,  अंटल पुणेचे हेमंत पाटील,  शैलेंद्र पांडे तसेच मायक्रोसॉफ्ट पुणेच्या मॅनेजर मोहिनी पाटील यावेळी उपस्थित होते. 

सौ. शरयू देशमुख म्हणाल्या कि, माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने गुणवत्तेच्या बाबतीत देशात आपला लौकिक निर्माण केला आहे. अमृतवाहिनी संस्थेचे विद्यार्थी सध्या देश विदेशात चांगल्या पदावर कार्यरत आहे. हा संगमनेर करांसाठी अभिमान असून संस्थेचे माजी विद्यार्थी हेच अमृतवाहिनी चे खरे ब्रँड अँबेसिडर आहे. अमृतवाहिनीने गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळावा ते वृद्धिंगत व्हावी यासाठी विविध उपक्रम लाभले आहे. त्याचाच परिणाम म्हणून अमृतवाहिनी शिक्षण संस्था ज्ञानदानाची गंगोत्री ठरली आहे.

यावेळी प्राचार्य डॉ. एम. ए. म्हणाले, अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय हे आता एक महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहे. यापुढे महाविद्यालयाच्या गुणवत्ता वृद्धी साठी माजी विद्यार्थ्यानी कॅम्पस प्लेसमेंट, इंटर्नशिप, प्रोजेक्ट तसेच औद्योगिक भेटी इंडस्ट्रियल लेक्चर्स साठी वेळ द्यावा आणि ऑटोनॉमस अभ्यासक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहकार्य करावे. महाविद्यालयाने "अल्युमनी बडी" योजना यापूर्वी सुरू केल्याने सर्व पात्र विद्यार्थ्याना प्लेसमेंट मिळत असून नुकतेच इनोवेशन अँड इंक्युबॅशन सेंटर सुरू केलेले आहे. यामध्ये नवनवीन स्टार्टअप, व्यवसाय वृद्धीसाठी माजी विद्यार्थ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करावे.” यावेळी ४२९ माजी विद्यार्थ्यानी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात नोंदणीनंतर फन गेम्स ने झाली. यानंतर विभागानुसार माजी विद्यार्थ्यांनी पॅनेल चर्चा मध्ये भाग नोंदवला. यामध्ये संबंधित क्षेत्रातील आधुनिक घडामोडी इंजीनियरिंग ट्रेंड्स, मार्केट याबद्दल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा प्रभाव यावर माजी विद्यार्थ्यानी आपली मते नोंदवली. 

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी माजी विद्यार्थ्याच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आणि सहकार्याबद्दल अभिनंदन केले आहे. 

मुख्य कार्यक्रमाचे स्वागत मेकॅनिकल विभागाचे प्रमुख डॉ. व्ही. डी. वाकचौरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मयुरी गाढे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन टीपीओ प्रा प्रवीण वाकचौरे यांनी केले. यावेळी ४२९ माजी विद्यार्थी, सर्व विभागप्रमुख, आणि ज्येष्ठ शिक्षक कार्यक्रमास उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !