उद्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अनावरण सोहळा ऐतिहसिक ठरणार
◻️ डाॅ. विखे पाटील यांचे शिवप्रेमीसह नागरीकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन
संगमनेर LIVE (श्रीरामपूर) | श्रीरामपूर शहराच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात आलेल्या भव्य शिवस्मारकाचे लोकार्पण रविवारी संपन्न होत असून, श्रीरामपूरकर नागरीकांच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा
ऐतिहासिक सोहळ्यास शिवप्रेमी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन डाॅ. सुजय विखे पाटील यांनी केले.
संगमनेर - श्रीरामपूर - नेवासा मार्गावरील भाजी मंडई समोर उभारण्यात आला असून, श्रीरामपूरकरांच्या मनामनात नवचैतन्य निर्माण करणारा आणि शिवचरित्राची प्रेरणा देणारे स्मारक असल्याचे विखे पाटील म्हणाले.
या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन उद्या रविवार दि. २ नोव्हेबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री नामदार उदय सामंत यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील भूषवणार आहेत.
याप्रसंगी शहरातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रम, शौर्य आणि लोकसेवेच्या प्रेरणेतून उभारलेला हा पुतळा श्रीरामपूरच्या इतिहासात अभिमानाचा आणि प्रेरणेचा नवा अध्याय ठरणार असल्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रत्येक पिढीला राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि लोकसेवेची दिशा मिळते. श्रीरामपूरसारख्या ऐतिहासिक शहरात महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणे हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. या स्मारकामुळे भावी पिढ्यांना इतिहासाची प्रेरणा मिळत राहील.”
दरम्यान या लोकार्पण सोहळ्यासाठी समस्त शिवप्रेमी श्रीरामपूरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.