तरुणाईच्या ट्रेंडमधील 'फोक आख्यान'चा होणार जागर - डॉ. जयश्रीताई थोरात

संगमनेर Live
0

तरुणाईच्या ट्रेंडमधील 'फोक आख्यान'चा होणार जागर - डॉ. जयश्रीताई थोरात 

◻️ एकविरा फाउंडेशन आणि 'आय लव संगमनेर' च्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन


संगमनेर LIVE | ​लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरात थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त 'फोक आख्यान' या लोकप्रिय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम मंगळवार, ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता जाणता राजा मैदानावर सर्वासाठी मोफत आयोजित करण्यात आला आहे.

​कार्यक्रमाची वैशिष्ट्ये..

एकविरा फाउंडेशन आणि ‘आय लव संगमनेर' चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्राची समृद्ध लोककला, संस्कृती आणि परंपरा नव्या पद्धतीने सादर करणारा हा 'फोक आख्यान' सध्या तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे, मुंबई-पुण्यासारख्या महानगरांनंतर तालुका पातळीवर प्रथमच जिल्ह्यात होणारा हा पहिला कार्यक्रम आहे.

​सादर होणारे कलाप्रकार..

यामध्ये भारुड, गवळण, देवीचा जागर, खंडोबाची गाणी, आदिवासी लोकगीते, जात्यावरची गाणी, पोवाडे, लावणी आणि स्फूर्तीदायी गीते अशा पारंपारिक लोकगीतांचा अनमोल खजिना आधुनिक स्वरूपात सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमात एकूण ७५ कलाकारांचा भव्य संच सहभागी होणार असून, मराठी चित्रपट व मालिकांमधील लोकप्रिय अभिनेते - अभिनेत्रींचाही यात सहभाग असणार आहे.

दरम्यान याप्रसंगी बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ​हा कार्यक्रम सर्वासाठी मोफत असला तरी, युवकांना पास नोंदणीसाठी https://event.ekvirafoundation.com या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !