अद्यावत वाचनालयासाठी प्रत्येकी ३० लाख रुपये निधी - डॉ. जयश्रीताई थोरात

संगमनेर Live
0
अद्यावत वाचनालयासाठी प्रत्येकी ३० लाख रुपये निधी - डॉ. जयश्रीताई थोरात

◻️ ज्येष्ठ नेते थोरात यांच्या पाठपुराव्यातून चंदनापुरी, धांदरफळ बु।। आणि निमगाव बु।। येथे अद्यावत वाचनालय


संगमनेर LIVE | यशवंतराव चव्हाण यांचे समृद्ध वारसदार अशी ओळख असलेले महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका हा सहकार, शेती, शिक्षण, जलसिंचन, ग्रामीण विकास यामधून राज्यात आदर्शवत बनवला आहे. तालुक्यातील तरुणांना स्पर्धा परीक्षा व वाचनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरता अद्यावत १२ अभ्यासिका निर्माण केल्या जाणार असून चंदनापुरी, निमगाव बुद्रुक व धांदरफळ बुद्रुक येथे या नवीन अभ्यासिकांचे भूमिपूजन डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी रामहरी कातोरे, अनिल देशमुख, विजय राहणे, शांताराम कढणे, चंदनापुरीचे सरपंच भाऊराव रहाणे, उपसरपंच सौ. हौशाबाई कढणे, हर्षल राहणे, रोहिदास राहणे, धांदरफळ सरपंच सौ. उज्वला देशमाने, सतीश खताळ, मनीष गोपाळे, भास्कर गोपाळे, कारभारी शेळके, माधवराव कानवडे, सरपंच सोमनाथ, सचिन कानवडे, राजेंद्र कानवडे, भाऊसाहेब फरगडे, राजेंद्र मोरे आदींसह गावातील ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक गावात विकासाच्या मूलभूत योजना राबवल्या आहेत. ग्रामीण विकासातून संगमनेर तालुका राज्यात अग्रगण्य बनवला आहे. याचबरोबर तरुणांसाठी सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले असून त्यांच्या कलागुणांना वाव दिला आहे. 

संगमनेर हे आता गुणवत्तेचे शैक्षणिक केंद्र निर्माण झाले असून ग्रामीण विद्यार्थ्याना वाचनालय व आधुनिक अभ्यासिका निर्माण व्हावी याकरता १२ अभ्यासिका मंजूर केल्या आहेत. या प्रत्येक अभ्यासिका ३० लाख रुपयांच्या निधीतून उभारल्या जाणार आहेत. या अभ्यासिकांमधून तरुणांना वाचनाची मोठी संधी निर्माण होणार आहे. या माध्यमातून आदर्श व समृद्ध तरुण पिढी निर्माण होणार आहे.

संगमनेर मध्ये सध्या सुरू झालेल्या विविध आमली पदार्थाची तस्करी ही तरुण पिढीसाठी अत्यंत भयावह असून याबाबत लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सातत्याने पालकांना जागरूक राहण्याची आव्हान केले असून आपली तरुण पिढी वाचवण्यासाठी त्यांना वाचनाची सवय लावणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !