प्रचाराचा ज्वर शिगेला! उद्या महायुतीकडून ‘हाय-व्होल्टेज' प्रचार रॅलीचे आयोजन

संगमनेर Live
0

प्रचाराचा ज्वर शिगेला! उद्या महायुतीकडून ‘हाय-व्होल्टेज' प्रचार रॅलीचे आयोजन

◻️ संगमनेर येथे ​डॉ. श्रीकांत शिंदे आणि डॉ. सुजय विखे यांचा ‘वन-डे' दौरा

◻️ नगरपरिषद निवडणुकीत महायुतीची ‘शक्ती' परीक्षा


संगमनेर LIVE | संगमनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि आरपीआय महायुतीने शहरात आपले जबरदस्त शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे.

निवडणुकीच्या प्रचाराला अंतिम आणि निर्णायक स्वरूप देण्यासाठी, महायुतीच्या केंद्रीय नेतृत्वामधील दोन प्रमुख आणि तरुण चेहरे असलेले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य प्रचार रॅली अर्थात रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे.

​प्रमुख उपस्थिती

या लक्षवेधी प्रचार रॅलीसाठी आमदार अमोल खताळ हे देखील उपस्थिती असणार आहे. हे तिन्ही प्रमुख नेते उद्या उपस्थिती राहणार असल्याने संगमनेरमधील महायुतीच्या उमेदवारांमध्ये मोठा उत्साह संचार आहे. तर स्थानिक कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. महायुतीची ही 'शक्ती' संगमनेरच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

​प्रचार रॅलीचा मार्ग आणि वेळ

ही प्रचार रॅली उद्या सोमवार, दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक ९ वाजता सुरू होईल. ही रॅली संगमनेर शहर प्रभाग निहाय काढण्यात येणार असून, ती शहराच्या मुख्य भागातून जाणार आहे. संगमनेर कॉलेज पासून रॅलीला सुरुवात होणार आहे‌. आझाद चौक, अकोले रोड, जनता नगर, अभिनवनगर, तीनबत्ती, मोगलपुरा, घासबाजार, चंद्रशेखर चौक, रंगार गल्ली, घोडेकरमळा, नगरपालिका, सय्यदबाबा चौक, अशोक चौक, शिवाजी महाराज स्मारक यामार्गे नवीन नगर रोड येथे रॅलीची सांगता होणार आहे.

​शहरातील प्रत्येक विभागातील मतदारांपर्यंत थेट पोहोचून महायुतीचे उमेदवार आणि त्यांचे विकासाचे व्हिजन मतदारांसमोर स्पष्ट करणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे.

​कार्यकर्त्याना आवाहन

महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि संयोजकांनी सर्व मतदार बंधू-भगिनींना, तसेच शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यकर्त्याना व हितचिंतकांना या ऐतिहासिक प्रचार रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित राहून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !