जिल्हा बॅकेच्या 'चेअरमन'पदी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील बिनविरोध!

संगमनेर Live
0
जिल्हा बॅकेच्या 'चेअरमन'पदी माजी आमदार चंद्रशेखर घुले बिनविरोध!

◻️ मंत्री विखेंचा नवा मास्टरस्ट्रोक! विखे - काळे यांचा 'पडद्यामागील समन्वय' ठरला निर्णायक

संगमनेर LIVE (​अहिल्यानगर) | जिल्हा सहकारी बॅकेच्या रिक्त झालेल्या चेअरमन (अध्यक्ष) पदासाठी आज, सोमवार (दि. २४) रोजी झालेल्या निवड प्रक्रियेत माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची बिनविरोध निवड झाली आहे.

​सकाळपासूनच या निवडीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सकाळी ११ वाजता जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची अधिकृत बैठक पार पडली आणि यामध्ये घुले यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.

​'राज पॅलेस'मधील चहापान बैठक ठरली महत्त्वाची..

निवड प्रक्रियेपूर्वी सकाळी ९ वाजता नगरमधील 'राज पॅलेस' येथे संचालकांची एक अनौपचारिक चहापान बैठक पार पडली. या बैठकीतच चेअरमनपदासाठी चंद्रशेखर घुले यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब झाले होते, ज्यामुळे अधिकृत निवड बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.

​राजकीय समीकरणे आणि विखे-काळे समन्वय..

या निवडीमागे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पडद्यामागील भूमिका अत्यंत निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विशेष म्हणजे, घुले पाटील हे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचे सासरे आहेत. त्यामुळे, काळे आणि विखे यांच्यातील सध्याचा राजकीय समन्वय या बिनविरोध निवडीत एक महत्त्वाचा घटक ठरला, असे मानले जाते. अनेक संचालकांनी पुढील राजकीय समिकरणांसाठी विखे पाटील यांचे सहकार्य टिकवून ठेवणे आवश्यक मानले, ज्यामुळे घुले यांच्या समर्थनाचा कल स्पष्ट दिसून आला.

​मतदानाधिकार असलेले संचालक (एकूण १९)..

निवडीसाठी मतदानाधिकार असलेल्या १९ संचालकांमध्ये मोनिका राजळे, आण्णासाहेब म्हस्के, अंबादास पिसाळ, अमोल राळेभात, आशा तापकीर, भानुदास मुरकुटे, सीताराम गायकर, अरुण तनपुरे, चंद्रशेखर घुले, राहुल जगताप, आशुतोष काळे, प्रशांत गायकवाड, अनुराधा नागवडे, अमित भांगरे, गीतांजली शेळके, माधवराव कानवडे, करण ससाणे, गणपतराव सांगळे आणि शंकरराव गडाख यांचा समावेश होता.

​घुलेनी केली कृतज्ञता व्यक्त..

बिनविरोध निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित चेअरमन चंद्रशेखर घुले यांनी संचालक मंडळाने आपल्यावर व्यक्त केलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानले. त्याचबरोबर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !