उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सभेनंतर सुवर्णा खताळ यांच्या प्रचाराला मिळाले बळ!
◻️ महिला, युवा आणि ज्येष्ठ नागरिकांचा प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
संगमनेर LIVE | संगमनेर नगरपरिषद निवडणुकीची प्रचार रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या (शिंदे गट) नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा संदीप खताळ यांनी प्रभागनिहाय प्रचारात घेतलेली आघाडी लक्षवेधी ठरत आहे. शहरात आणि उपनगरांत त्यांचा जनसंपर्क वाढत असताना, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नुकत्याचं पार पडलेल्या प्रचार सभेमुळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ यांच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेला नागरिकांचा प्रतिसाद
संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी पार पडलेल्या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या सभेला नागरिकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. गर्दीचा ओघ, घोषणा आणि उत्साहामुळे सभेला एक उत्स्फूर्त स्वरूप प्राप्त झाले. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संगमनेरच्या विकासासाठी ठोस पाऊले उचलण्याचा शब्द दिला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शहरातील चाळीस वर्षापासून रखडलेले महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांसाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे.
महिला, युवा आणि ज्येष्ठ नागरिकांकडून वाढता पाठिंबा
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेचा थेट परिणाम सुवर्णा खताळ यांच्या प्रचाराला नवी बळ देत आहे. स्थानिक पातळीवर अनेक प्रभागांमध्ये त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्याचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. विशेषतः महिला, युवा आणि ज्येष्ठ नागरिक या तिन्ही घटकांकडून त्यांच्या प्रचाराला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
सुवर्णा खताळ यांच्या प्रचारयात्रांना मिळणारा उत्साह आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सभेचा एकत्रित प्रभाव पाहता,प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. दरम्यान शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वालाही या वाढत्या प्रतिसादामुळे नवी ऊर्जा मिळाल्याचे दिसून येत आहे.