‘टोल वसुली सोडा, आधी नगर-मनमाड रस्ता पूर्ण करा!’

संगमनेर Live
0
‘टोल वसुली सोडा, आधी नगर-मनमाड रस्ता पूर्ण करा!’

◻️ बाळासाहेब थोरात यांची महायुतीवर घणाघाती टिका 

◻️ ​'डोंगर मंजूर, नद्या मंजूर' उपमुख्यमंत्र्यांवर उपरोधिक टिका


​संगमनेर LIVE | ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमधील जाहीर सभेत महायुतीच्या स्थानिक नेतृत्वावर आणि पालकमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. मागील तीस वर्षात संगमनेर नगरपालिकेने केलेल्या विकासाचे दाखले देत, त्यांनी विरोधकांकडून सुरू असलेल्या कथित 'टोल वसुली' आणि शहरात वाढलेल्या 'अस्वस्थते'वर गंभीर आरोप केले.

​'डोंगर मंजूर, नद्या मंजूर' - थोरातांकडून उपमुख्यमंत्र्यांवर उपरोधिक टिकास्त्र 

​नाशिक-पुणे रोडवर मार्केट कमिटीसमोर आयोजित संगमनेर सेवा समितीच्या जाहीर सभेत थोरात बोलत होते. त्यांनी महायुतीच्या मंत्र्यांच्या कार्यशैलीवर उपरोधिक टीका केली. “महायुतीचे मंत्री डोंगर मंजूर, नद्या मंजूर असे सांगत आहेत. बनवाबनवी आणि निवडणुकीसाठी वेगवेगळे फंडे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. आधी नगर-मनमाडचा गचक्यांचा रस्ता पूर्ण करा आणि मग संगमनेरला या," अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्र्यासह पालकमंत्र्यावर निशाणा साधला.

​स्वच्छ पाणी, निळवंडे धरण ते ३५ गार्डन्स.. विकासाची गाथा

​बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात कॉग्रेसच्या तीस वर्षांच्या सत्ताकाळात झालेल्या विकासाचा लेखाजोखा मांडला. यामध्ये उत्तर नगर जिल्ह्यासाठी निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण केल्याचे सांगताना प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले. शहरात ३८ किलोमीटरची पाईपलाईन पूर्ण करून नवे जाळे निर्माण केले, ज्यामुळे संगमनेरला स्वच्छ पाणी उपलब्ध झाले. ​पायाभूत सुविधाची माहिती देताना म्हणाले, संगमनेर बस स्थानक, विविध रस्ते आणि बायपास पूर्ण केला. शहरात वैभवशाली इमारती निर्माण केल्या, ३५ गार्डन्स उभारल्या. हे एका दिवसात झाले नाही, त्यासाठी कष्ट केले आहे," असे ते म्हणाले.

​'ड्रग्स-गुंडगिरी'वर थेट हल्ला

​माजी मंत्री थोरात यांनी मागील एका वर्षापासून संगमनेरमध्ये 'अस्वस्थता' वाढल्याचे नमूद केले. "ड्रग्स आणि अमली पदार्थ मिळत आहेत, याला कुणाचे अभय आहे? पोलीस स्टेशनमध्ये मारामाऱ्या होत आहेत, गुंडगिरी वाढली आहे. हे कोणाच्या आशीर्वादाने हे लक्षात घ्या," असा इशारा त्यांनी दिला.

​राजकीय टोलेबाजी
​आमदार सत्यजीत तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कामांची माहिती दिली. तसेच शहरात बिघडलेले वातावरण सुधारण्याचे आश्वासन दिले. "निवडणुकीनंतर संगमनेरमध्ये एकही अनाधिकृत फ्लेक्स लागणार नाही किंवा कोणताही कार्यक्रम रस्त्यावर होणार नाही," असे ते म्हणाले.

​उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणावर टीका

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल संगमनेरमध्ये फोन करून विकासकामांचे आश्वासन दिल्याचा संदर्भ देत तांबे यांनी खोचक टीका केली. "एप्रिल २०२५ मध्ये मी एमआयडीसीसाठी पत्र दिले आणि त्याचे उत्तर २६ नोव्हेंबर २०२५ रोजी मिळाले; सर्वेचे काम सुरू आहे. आरोग्यमंत्र्यांना फोन केला, पण ते काम माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी २८ जानेवारी २०२० रोजीच मंजूर करून ठेवले आहे," असे सांगत त्यांनी महायुतीच्या दाव्यातील फोलपणा उघड केला.

सत्यजीत तांबे यांचा 'टायगर' आणि 'सिंह'चा टोला

विरोधकांनी कालच्या सभेत 'टायगर' आल्याचे म्हटले होते, त्यावर टीका करताना सत्यजीत तांबे म्हणाले, "टायगर हा एकटा येतो कारण तो स्वार्थी असतो. सिंह हा जंगलचा राजा असतो. तो सर्वांना बरोबर घेऊन येतो."

​संगमनेर २.० जाहीरनामा प्रसिद्ध

​आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर सेवा समितीच्या वतीने पुढील पाच वर्षात करावयाच्या कामांचा 'संगमनेर २.०' हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. महाराजांचा अश्वारूढ पुतळा व आरक्षण मुद्दा पुढील एका वर्षात मार्गी लावण्याचे आश्वासन तांबे यांनी दिले. या कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, कारण माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा शब्द प्रत्येक मंत्र्यासाठी अत्यंत आदराचा असतो, असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, विश्वासराव मुर्तडक, दिलीपराव पुंड, डॉ. जयश्रीताई थोरात, सोमेश्वर दिवटे, डॉ. मैथिलीताई तांबे, हिरालाल पगडाल, पप्पू कानकाटे, इसाक खान पठाण, अजय फटांगरे, सौ. प्रमिला अभंग यांच्यासह सेवा समितीचे सर्व उमेदवार आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !