संगमनेरमध्ये खासगी डॉक्टरांना मोठा दिलासा! ‘एक खिडकी’ साठी शासन सकारात्मक

संगमनेर Live
0
संगमनेरमध्ये खासगी डॉक्टरांना मोठा दिलासा! ‘एक खिडकी’ साठी शासन सकारात्मक 

◻️ ​पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांच्या पाठपुराव्याला यश

◻️‘ना हरकत दाखला’ आता ५ वर्षासाठी मिळणार!


​संगमनेर LIVE | ​जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे आणि स्थानिक आमदार आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नातून संगमनेर शहरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या समस्या अखेर मार्गी लागल्या आहेत. 

शहरात खासगी रुग्णालयांना ‘बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट' अंतर्गत नोंदणी देताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आरोग्य सहसंचालकांनी 'एक खिडकी प्रकल्प' (Single Window Project) सुरू करण्यास सकारात्मकता दर्शवली असून, 'ना हरकत दाखला' (NOC) आता पाच वर्षासाठी देण्याबाबत नगरविकास विभागासोबत तातडीने बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.

​आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

​खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री नामदार विखे पाटील यांच्या उपस्थितीत आमदार खताळ यांच्या पाठपुराव्याने आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनाच्या दालनात १४ सप्टेंबर २०२५ रोजी एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.
​या बैठकीत आमदार खताळ यांनी खासगी रुग्णालयांना 'बॉम्बे नर्सिग होम ॲक्ट' अंतर्गत नोंदणी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळण्यात होणारा विलंब प्रामुख्याने निदर्शनास आणून दिला.

​बैठकीत झालेले महत्त्वाचे निर्णय

​बैठकीत वैद्यकीय व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊले उचलण्यास सहमती दर्शवण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय व्यावसायिकांना नोंदणी प्रक्रियेत कोणताही त्रास होऊ नये यासाठी तात्काळ ‘एक खिडकी प्रकल्प' राबविण्यात येणार आहे. वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी दिला जाणारा 'ना हरकत दाखला' (NOC) आता पाच वर्षाच्या दीर्घ कालावधीसाठी देण्यात यावा, या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. 

तसेच नगर विकास रचना विभागाशी समन्वय साधून पूर्वी बांधलेल्या हॉस्पिटल्सना दंड (पेनल्टी) वसूल करून सदर इमारती नियमित (रेग्युलराईज) करण्याची तरतूद अंतर्भूत करण्याची मागणीही आमदार खताळ यांनी केली, याबाबतही आरोग्य विभागाने सकारात्मकता दर्शवली आहे.

​आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत यांनी वैद्यकीय व्यावसायिकांच्या समस्या तसेच ‘ना हरकत प्रमाणपत्र' देण्यातील तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी नगर विकास विभागासोबत तातडीने बैठक घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे संगमनेरमधील आरोग्य क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !