हिंदू युवकांना शांतपणे संपवण्याचे षडयंत्र थांबवा - श्रीनिवास बिहाणी

संगमनेर Live
0
हिंदू युवकांना शांतपणे संपवण्याचे षडयंत्र थांबवा - श्रीनिवास बिहाणी

कॉग्रेस उमेदवार करन ससाने आणि आमदार ओगले यांच्यावर केले सनसनाटी आरोप 

संगमनेर LIVE (श्रीरामपूर) | पोलिसांच्या रेकॉर्डवरील व गांजा प्रकरणातील अट्टल गुन्हेगार सलीम शेख याच्या हस्ते आमदार ओगले यांच्या स्थानीक विकास निधीतून झालेल्या विकास कामांचे उदघाट्न करणारे आज निवडणुकीच्या निमित्ताने मोठं मोठाल्या गप्पा मारून मतदारांना मुर्खात काढत असले तरी, हिंदू युवकांची पिढी नशेच्या आहारी ढकलण्याचे पाप करणाऱ्या व हिंदू युवकांना शांतपणे संपवण्याचे काम काँग्रेस उमेदवार करन ससाने व आमदार ओगले हे करत असल्याचा सनसनाटी आरोप करुन यांना शहरातील जनता कदापी माफ करणार नसल्याची संतप्त प्रतिक्रिया महायुतीचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांनी व्यक्त केली.

आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त करतांना श्रीनिवास बिहाणी यांनी म्हंटले आहे की, शहरात गुन्हेगारी वाढली म्हणून उठसुठ कोल्हेकुई करणारेच आज गांजा प्रकरणातील अट्टल गुन्हेगाराच्या हस्ते आमदार निधीतुन फकीर वाडा या भागात झालेल्या विकास कामांचे उदघाट्न करत आहेत. 

आचारसंहिता लागू होण्याअगोदर व पालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेवून मतदारांना भुलवण्याठी मुस्लिम मोहल्ल्यातील फकीरवाडा या भागात पेव्हिंग ब्लॉक आमदार ओगले यांच्या स्थानीक विकास निधीतून बसवण्यात आले त्या कामाचे उदघाट्न स्थानीक प्रतिष्ठितांच्या हस्ते किंवा सर्वसामान्यांच्या हस्ते करने अपेक्षित होते पण त्या कामाचे उदघाट्न पोलिसांच्या रेकॉर्डवरील व गांजा प्रकरणातील अट्टल गुन्हेगाराच्या हस्ते केले, असा खळबळजनक दावा केला आहे.

त्या उदघाटक गुन्हेगाराने अवैधमार्गाने शहरात गांजा आणून शहरातील असंख्य हिंदू युवकांना गांजाच्या आहारी लावले असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचा दावा करुन शहरातील हिंदू युवक मोठया प्रमाणात गांजा नशेच्या आहारी गेल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याचे देखील म्हटले. 

अशा अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांना राजकीय आश्रय देण्याचे काम शहरात अनेक वर्षापासून कॉग्रेसी ससाने गटाने अखंडपणे केले आहे. या उदघाट्न कार्यक्रमास आज प्रभाग क्रमांक बारा मधून निवडणूक रिंगणात असलेले कॉग्रेसचे उमेदवार असलेले भाग्येश लोखंडे व गुड्डू यादव हे देखील उपस्थित होते.

त्यामुळे हिंदू युवकांना संपवण्याचे शांतपणे चालू असलेले हे कॉग्रेसी षडयंत्र थांबवायचे असेल तर काँग्रेस उमेदवार करन ससाने व त्यांच्या उमेदवारांना सत्तेपासून दूर ठेवा. असे आवाहन श्रीनिवास बिहाणी यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !