आमदार अमोल खताळ यांच्याकडून संगमनेर भाजप संपवण्याचा डाव

संगमनेर Live
0
आमदार अमोल खताळ यांच्याकडून संगमनेर भाजप संपवण्याचा डाव

◻️ सौ. मेघा भगत यांचा निधी घेऊन तिकीट वाटप केल्याचा आरोप

◻️ निष्ठावंताना डावल्याने संगमनेर भाजमध्ये नाराजीचा सूर

संगमनेर LIVE | संगमनेर विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेले आमदार अमोल खताळ यांच्या प्रचारासाठी भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यानी काम केले. त्यांच्या प्रचारात त्यांचा एकही कार्यकर्ता नव्हता. मात्र, भाजपच्या जीवावर आमदार झालेल्या अमोल खताळ यांनी घराणेशाही सुरू केली. आता तर, ते भाजप संपवण्याचा डाव करत असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या महिला आघाडीच्या प्रमुख आणि माजी नगरसेविका सौ. मेघा भगत यांनी केला. तसेच निधी घेऊन तिकीट वाटप केल्याचा खळबळजनक दावा देखील केला.

सौ. मेघा भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार अमोल खताळ यांच्यावर टीकास्त्र सोडले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते दीपक भगत यांच्यासह भाजपचे निष्ठावंत पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सौ. मेघा भगत म्हणाल्या की, आम्ही २०१६ पासून भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ता आहोत. मागील सत्रामध्ये मी एकमेव भाजपची महिला नगरसेविका होते. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यानी अत्यंत जीवाचे रान करून अमोल खताळ यांना निवडून आणले, त्यावेळी खताळ यांचे कोणतेही कार्यकर्ते नव्हते.

मात्र, सत्तेवर आल्यानंतर खताळ यांनी भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याना डावल्याचे काम केले आहे. नगरपालिका निवडणुकीमध्ये निधी घेऊन तिकिटांचा वाटप केल्याचा दावा करताना निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली. आमदार खताळ यांनी मनमानी करत त्यांच्या समर्थकांना तिकीट वाटप केल्याचे म्हणताना तिकीट वाटपामध्ये मोठा गोंधळ झाला असल्याचा घणाघात केला. त्यामुळे निष्ठावंतांना डावलले गेले असून ते नाराज आहे. अमोल खताळ हे शिवसेनेचे आमदार असल्याने संगमनेर भाजपचे खच्चीकरण करण्याचे काम ते करत आहे. याबाबत आम्ही प्रदेशाध्यक्षांकडे सुद्धा तक्रार केली असल्याचे सांगितले.

अमोल खताळ यांनी घराणेशाही सुरू केली आहे. थोरात, तांबे यांच्या घराणे वर आरोप करण्याचा आता त्यांना कोणताही अधिकार नाही. त्यांच्या भावजय सुवर्णा खताळ या तांबे यांच्या सह्याद्री संस्थेमध्ये नोकरीला आहे. त्यांनी कधीही शिवसेनेचा किंवा महायुतीचा प्रचार केला नाही. अथवा महायुतीसाठी कोणतेही योगदान दिले नाही. फक्त घराणेशाही मुळे त्यांना थेट नगराध्यक्ष पदाचे तिकीट दिले आहे. मग आमच्यासारख्या निष्ठावंतांनी काय करायचे? असा सवाल करताना सौ. मेघा भगत यांना गहिवरून आले. संगमनेरच्या जनतेला आता सर्व कळून चुकले आहे. आम्ही भाजपचेच आहोत भाजपमध्येच राहणार असल्याचे सौ. मेघा भगत व दीपक भगत यांनी सांगितले.


आम्ही कायम भाजपचे निष्ठावंत आहोत. विधानसभेसाठी भाजपला उमेदवारी मिळावी ही मागणी आम्ही केली आणि तो राग धरून आमदार अमोल खताळ यांनी आमचे तिकीट कापले. सुवर्णा खताळ यांचे महायुतीसाठी योगदान काय असा सवाल करताना तुमच्या घरातील आहे म्हणजे तुम्ही तिकीट देत असेल तर, निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यानी फक्त सतरंज्या उचलायचा का? असा सवाल करताना जनता तुम्हाला या निवडणुकीत धडा शिकवेल, असे दीपक भगत यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !