संगमनेरचा गड राखण्यासाठी बाळासाहेब थोरात मैदानात!

संगमनेर Live
0
संगमनेरचा गड राखण्यासाठी बाळासाहेब थोरात मैदानात!

◻️ शहराची शांतता, सुसंस्कृत परंपरा 'सेवा समिती' जपेन" - बाळासाहेब थोरात

​◻️ ग्रामदैवत लक्ष्मण बाबांचे दर्शन घेऊन ‘संगमनेरी सेवा समिती'च्या प्रचाराला सुरुवात!

​संगमनेर LIVE | ​संगमनेर तालुक्याला आणि शहराला अखंड विकासाची मोठी परंपरा आहे. विकासकामांच्या माध्यमातून आपण शहराला वैभव प्राप्त करून दिले आहे. शांतता, सुव्यवस्था आणि बंधुभाव हेच संगमनेर शहराचे खरे वैशिष्ट्य आहे. मात्र, मागील एक वर्षात सर्वत्र अशांतता निर्माण झाली असून, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. यापुढे, शहरात विकासकामांसोबतच बंधुभाव आणि शांतता वाढीस लागेल, यासाठी 'संगमनेरी सेवा समिती' सक्रियपणे काम करेल, असा ठाम विश्वास ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

​ग्रामदैवत लक्ष्मण बाबांचा आशीर्वाद..

​संगमनेरचे ग्रामदैवत लक्ष्मण बाबांचे दर्शन घेऊन ‘संगमनेरी सेवा समिती'च्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केला. यावेळी झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते.

​थोरात म्हणाले, "लक्ष्मण बाबा हे शहराचे ग्रामदैवत आहेत. शहरात धार्मिक आणि बंधुभावाचे वातावरण कायम राहावे, यासाठी आपण सतत प्रयत्न केले आहेत. निळवंडे पाईपलाईन असो, हायटेक बस स्थानक असो, किंवा इतर वैभवशाली इमारतींची निर्मिती असो, प्रत्येक विकासाचे नियोजन आम्ही काळजीपूर्वक केले. मात्र, त्याची कधी जाहिरातबाजी केली नाही."

बाळासाहेब थोरातांचे परखड मत..

“निवडणूक संपली की विरोधक किंवा समर्थक असा भेदभाव आम्ही कधी केला नाही. सर्वांना सोबत घेऊन सुसंस्कृत राजकारणाची आदर्श परंपरा संगमनेरमध्ये निर्माण केली आहे. त्यामुळेच संगमनेरमध्ये शांत आणि सुखाचे वातावरण आहे. मात्र, मागील एक वर्षापासून हे शहर अस्वस्थ झाले आहे.”

​शांतता आणि सुसंस्कृती जतन करण्याचे आवाहन
​माजी नगर परिषदेच्या कामाचा उल्लेख करत थोरात म्हणाले, “नगर परिषदेने सातत्याने दर्जेदार काम केले. स्वच्छ व सुंदर शहराच्या संकल्पनेत दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कचरा व्यवस्थापनासह अनेक योजना मार्गी लागल्या आणि या चांगल्या कामांना राष्ट्रीय-राज्य पातळीवर पुरस्कारही मिळाले."

​आगामी काळातही अनेक कामे करायची आहेत आणि बंधुभाव, शांतता, सुव्यवस्था वाढीस लागली पाहिजे, याकरिता प्रत्येकाने काम करणे आवश्यक आहे. आपल्याला आपली परंपरा, संस्कृती आणि आपले शहर जपायचे आहे. याच भूमिकेतून संगमनेरकर नागरिक 'संगमनेरी सेवा समिती'च्या माध्यमातून एकत्र आले आहेत.

याप्रसंगी शिवसेनेचे (उबाठा) अमर कतारी, उमेदवार कविता अमर कतारी, शैलेश कलंत्री, अंबादास आडेप, पप्पू नेहुलकर, प्रकाश कलंत्री, काशिनाथ आडेप, राजाभाऊ अवसक, दत्तात्रय थोरात, आकाश जेधे, लखन जेधे, सूरज बागे, सागर बागे, शुभम परदेशी, ललित शिंपी, मयूर जाधव, अंकित परदेशी, विशाल भोईर, भगवान घोडेकर, वेणू गोपाल कलंत्री, सतीश आडेप, गोविंद नागरे, किरण हासे, बाळासाहेब गुंजाळ, शंभू जवरे, गौरव जेधे, हर्षल जेधे, अल्ताफ शेख, रोहित वाळके यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
​युवकांचा गराडा आणि लक्षवेधी उत्साह!

​कार्यक्रमादरम्यान, तरुण व युवकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी 'आय लव संगमनेर' सेल्फी पॉइंट समोर थोरात यांच्यासोबत फोटो काढला आणि सेल्फीसाठी त्यांच्याभोवती गराडा घातला. 'संगमनेरी सेवा समिती'च्या उमेदवारांसाठी मतदारांमध्ये असलेला उत्साह आणि आनंद यावेळी विशेष लक्षवेधी ठरला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !