लोणी बुद्रुक येथे ४ कोटींहून अधिक किंमतीच्या विकासकामांचा शुभारंभ!

संगमनेर Live
0
लोणी बुद्रुक येथे ४ कोटींहून अधिक किंमतीच्या विकासकामांचा शुभारंभ

◻️ “दिलेला शब्द पाळणं हीच माझी खरी जबाबदारी!" - डॉ. सुजय विखे

◻️ १ कोटी ७१ लाख रुपये खर्चाच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचे केले भूमिपूजन


संगमनेर LIVE (लोणी) | जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून लोणी बुद्रुक येथे १ कोटी ७१ लाख रुपये खर्चाच्या भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्सचा भूमिपूजन समारंभ माजी खासदार तथा युवानेते डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. 

यावेळी बाजारतळ मंडईसाठी पत्राशेड व प्रसाधनगृह १ कोटी ४० लाख रुपये, सांडपाणी प्रकल्पाचे आस्थापिकरण १ कोटी १२ लाख रुपये, तसेच गोगलगाव घनकचरा प्रकल्प येथील पशुदाहिनी १ कोटी रुपये या विकासकामांचेही भूमिपूजन पार पडले. त्याचप्रमाणे लोणी मटन मार्केट येथील ५० लाख रुपये खर्चाच्या पशुदाहिनीचे लोकार्पण देखील युवानेते डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. हा कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती राहाताचे सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. 

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी व मार्केट गाळेधारकांच्या वतीने डॉ. सुजय विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. संतोष गोरडे पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात नामदार राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या चिकन-मटन मार्केटची माहिती दिली. या मार्केटमध्ये ३४ गाळ्यांची निर्मिती करण्यात आली असून यासाठी ६० लाख रुपये खर्च आला आहे. या मार्केटमध्ये स्वच्छता टिकून राहावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत, ज्यात अंदाजे एक कोटी रुपये खर्चाचा एसटीपी प्लांट मंजूर करण्यात आला आहे, ज्यामुळे अशुद्ध पाणी शुद्ध करून ड्रेनेजमध्ये सोडले जाईल. तसेच अंदाजे ३६ लाख रुपये किमतीची इन्सिनेरेटर मशीन उपलब्ध करण्यात आली आहे, ज्याद्वारे वेस्ट मटेरियलचे विघटन करण्यात येणार आहे.

लोणी बुद्रुक येथे झालेल्या या शॉपिंग कॉम्प्लेक्स, मटन मार्केट व विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, दर पाडव्याच्या बैठकीत आपण चर्चा केलेल्या प्रत्येक प्रश्नाचं आज समाधान झालं आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्स, मटन मार्केट, सांडपाणी प्रकल्प, घनकचरा प्रकल्प ही सगळी कामं आज प्रत्यक्षात उतरली आहेत. हे केवळ विकासकाम नाही, तर आपल्या गावाच्या एकतेचं आणि विश्वासाचं प्रतीक आहे. 

ते पुढे म्हणाले, “गावासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची आणि अध्यक्ष मॅडमची अंतर्मनातून इच्छा होती की ही सगळी कामं व्हावीत, आणि आज ती पूर्ण होत आहेत. जे गावांनी मागितलं, ते आज देण्यामध्ये आपण यशस्वी झालो." 

कृषी उत्पन्न बाजार समिती राहाता अंतर्गत मटन मार्केटचे लोकार्पण आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान डॉ. सुजय विखे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याचे विशेष कौतुक करताना म्हटलं की, शॉपिंग कॉम्प्लेक्स स्थलांतर करताना एकाही ग्रामस्थाने विरोध केला नाही, उलट सर्वांनी एकमताने सहकार्य दिलं. हा विश्वासच माझी ताकद आहे. तो विश्वास कधी तुटू देणार नाही. ते म्हणाले की, आज लोणी बुद्रुक आणि लोणी खुर्द ही गावं महाराष्ट्रातील प्रगतशील ग्रामपंचायतींचं उदाहरण ठरली आहेत. राजकारणात पदं येतात-जातात, पण दिलेला शब्द पाळणं हीच माझी खरी जबाबदारी आहे. पुढच्या काळात लोणी गाव हे शहराला टक्कर देईल आणि बाळासाहेब विखे पाटील, नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि अध्यक्ष मॅडम यांनी पाहिलेलं स्वप्न आपण मिळून पूर्ण करू. 

यावेळी त्यांनी बाजार समितीच्या संचालकांचे आणि सभापतींचे विशेष आभार मानत, बाजारातील स्वच्छता आणि पारदर्शक व्यवहारासाठी सर्वानी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समिती राहाताचे सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर, ट्रॅक सोसायटीचे चेअरमन माननीय नंदूशेठ, गावाचे सरपंच, ग्रामसेवक, बाजार समितीचे सर्व संचालक तसेच लोणी बुद्रुक व लोणी खुर्द येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !