निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्याना तातडीने पाणी सोडण्याचे आदेश
◻️ मंत्री विखे पाटलांच्या निर्णयाने शेतकऱ्यांच्या पिकांना ‘जीवनदान’!
संगमनेर LIVE (लोणी) | निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्यातून पाणी सोडण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण पाटील यांनी विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या.
उच्चस्तरीय कालव्यातून पाणी सोडावे या मागणीसाठी माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री नामदार विखे पाटील यांची भेट घेतली. भाजपाचे जेष्ठ नेते सीताराम भांगरे, सुनिता भांगरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सद्यपरिस्थितीत अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पिकांची लागवड केली आहे. पावसाळा ऋतू संपल्यापासून उच्चस्तरीय कालव्यांना पाणी सोडण्यात आलेले नसल्याची गंभीर बाब शिष्टमंडळाने मंत्री विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.
दरम्यान शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेवून उच्चस्तरीय कालव्यांना तातडीने आवर्तन सोडण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.