निमगाव खुर्द येथे ९ दिवसांचे आजारी बिबट्याचे बछडे सापडले

संगमनेर Live
0
निमगाव खुर्द येथे ९ दिवसांचे आजारी बिबट्याचे बछडे सापडले

◻️ थंडीने कुडकुडणाऱ्या बछड्याला शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानतेमुळे ‘जीवनदान’

​संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यात निमगाव खुर्द येथील निमगाव खुर्द - सांगवी रस्त्यालगत एका शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे थंडीने कुडकुडत असलेल्या आणि आजारी बिबट्याच्या नऊ ते दहा दिवसांच्या बछड्याला जीवदान मिळाले आहे. शेतकरी प्रवीण गोपाळे यांनी हे बछडे पाहताच तातडीने वनविभागाला याची माहिती दिली, ज्यामुळे या बछड्याला वाचवण्यात यश आले आहे.

​निमगाव खुर्द येथे प्रवीण गोपाळे यांच्या वस्ती नजिक असलेल्या घासच्या शेतालागत बिबट्याचे बछडे आढळून आले. ते अंदाजे नऊ ते दहा दिवसांचे असून, थंडीमुळे अत्यंत कुडकुडत होते आणि ते काही प्रमाणात आजार असल्याचे देखील दिसत होते. बछड्याची आई जवळपास नसल्यामुळे त्याची प्रकृती अधिक बिघडण्याची शक्यता होती.

​प्रवीण गोपाळे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ ही गंभीर माहिती वनविभागाकडे कळवली. माहितीची गंभीरता लक्षात घेऊन वनविभागाचे पथक अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले.

​गोपाळे यांच्या माहितीनुसार, वनविभागाचे वनपाल माने, वनरक्षक बेनके, तसेच वनसेवक शरद कानवडे हे तात्काळ निमगाव खुर्द येथे पोहोचले. त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक या आजारी आणि थंडीने गारठलेल्या ९ दिवसांच्या बछड्याला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासणीनंतर, या बछड्याला पुढील उपचार आणि काळजी घेण्यासाठी निमगाव खुर्द येथील वनविभागाच्या पर्यटन विभागात पाठवण्यात आले आहे. 

दरम्यान वन्यजीव आढळल्यास त्यांना स्पर्श न करता तातडीने वनविभागाला माहिती द्यावी. असे आवाहन वनविभागाने नागरिकांना केले आहे. अशी माहिती पत्रकार संजय गोपाळे यांनी कळवली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !