प्रोटोकॉल बाजूला, आमदार अमोल खताळ यांनी हाती घेतली बियाण्यांची टोपली!

संगमनेर Live
0
प्रोटोकॉल बाजूला, आमदार अमोल खताळ यांनी हाती घेतली बियाण्यांची टोपली!

◻️ ‘शेतकरी पुत्रा’ने मातीशी नाळ जपली; धांदरफळमध्ये शेतकऱ्यांसोबत गव्हाची पेरणी

​संगमनेर LIVE | कष्टाला मान देणारा आणि आपल्या जमिनीशी असलेली नाळ सदैव जपणारा लोकप्रतिनिधी म्हणून ओळख असलेले आमदार अमोल खताळ यांनी पुन्हा एकदा आपला हा साधेपणा सिद्ध केला आहे. 

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे सांत्वन भेटीसाठी आलेले आमदार खताळ यांनी कोणताही 'आमदारकीचा दिखावा' न करता, थेट शेतात उतरून गव्हाच्या बियाण्यांची टोकरी स्वतः हाती घेतली आणि शेतकऱ्यांसोबत पेरणीचे काम सुरू केले. आमदारांचा हा अनपेक्षित पण मन जिंकणारा साधेपणा पाहून उपस्थित शेतकरी आणि ग्रामस्थ थक्क झाले.

​मिळालेल्या माहितीनुसार, आमदार अमोल खताळ हे धांदरफळ खुर्द येथे सुदाम खताळ यांच्या निवासस्थानी सांत्वन भेटीसाठी आले होते. भेट आटोपल्यानंतर ते माघारी परतत असताना, रस्त्याच्या कडेला सोमनाथ खताळ यांच्या शेतात गव्हाची पेरणी (गहू फुकणे) सुरू असल्याचे त्यांना दिसले.

​परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांना थांबण्याची विनंती केली. शेतकऱ्यांचा आग्रह पाहून आमदार खताळ यांनी तत्काळ आपली गाडी थांबवली आणि कोणताही औपचारिकपणा न ठेवता थेट शेतात प्रवेश केला. त्यांनी कोणतीही औपचारिकता न पाळता, सोमनाथ खताळ यांच्या हातातील गव्हाच्या बियाण्यांची टोपली स्वतःच्या हातात घेतली.

​हातात टोपली घेतल्यानंतर आमदार खताळ यांनी स्वतः शेतात उतरून गहू फुकण्याचे काम सुरू केले. आमदार असूनही, पद आणि प्रतिष्ठेचा कोणताही अहंकार न बाळगता त्यांनी शेतीत राबणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांप्रमाणे काम केले. ‘आपणही एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहोत’ हे त्यांनी केवळ बोलून न दाखवता, प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.

​आमदारांचा हा सहज आणि अस्सल साधेपणा पाहून उपस्थित नागरिक थक्क झाले. एक आमदार असूनही जमिनीशी असलेले त्यांचे नाते कायम आहे, याची प्रचिती धांदरफळ खुर्द येथील शेतकऱ्यांनी अनुभवली. त्यांच्या या कृतीने शेतकरी आणि ग्रामस्थ भारावून गेले.

​“आमदार असूनही त्या पदाचा कोणताही अहंकार नाही. आम्हा सर्व शेतकऱ्यांच्या कामात ते सहजतेने सामील झाले. हे दृश्य पाहून सगळेच अवाक झालो आणि खूप आनंद झाला,” अशी भावना उपस्थित शेतकऱ्याने व्यक्त केली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !