‘अकारी पडीत’ जमीन धारकांना मोठा दिलासा!
◻️ विखे पाटलांच्या पाठपुराव्यावर महसूल मंत्र्यांचे शिक्कामोर्तब
◻️ अधिवेशन संपताच राजभवनात यशस्वी प्रयत्न करण्याची ग्वाही
संगमनेर LIVE (श्रीरामपूर) | अकारी पडीत जमीन धारकांच्या ज्वलंत प्रश्नावर न्याय भूमिका घेण्याची ग्वाही महायुती सरकारने दिली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यापूर्वी केलेल्या पाठपुराव्यावर लवकरच शिक्कामोर्तब करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे स्पष्ट केली.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने अकारी पडीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली.
या बैठकीत महसूलमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकारी पडीत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाचे सर्व प्रश्न शांतपणे समजून घेतले आणि त्यांच्याशी अत्यंत सकारात्मक चर्चा केली.
अकारी पडीत प्रश्नाच्या संदर्भात यापूर्वीच मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. उर्वरित अन्य काही निर्णय तातडीने घेण्यासाठी महायुती सरकार निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “गोरगरीब अकारि पडीत शेतकऱ्यांचा हा प्रश्न सोडविणे ही माझी ठाम भूमिका आहे. मंत्रिमंडळ बैठकीत यापूर्वी निर्णय घेतलेला आहे. अधिवेशन संपल्यानांतर आम्ही मुंबईत राजभवनात राज्यपाल महोदयांची भेट घेऊन, सर्व निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करू.”
दरम्यान या बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, अँड. अजित काळे यांच्यासह ९ गावातील २५ शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, चळवळीचे याचिकाकर्ते गिरीधर आसने,भाजपाचे दिपक पटारे, सचिन वेताळ, गोविंद वाघ, सुनिल आसने, संतोष मुठे, चंद्रकांत खरे, बाळासाहेब वेताळ, गोरखनाथ वेताळ, बापुसाहेब गोरे, प्रशांत शिंदे, आदीनाथ दिघे, सोमनाथ रूपटक्के, दादासाहेब रूपटक्के, राजेंद्र गोसावी, अक्षय मुठे, सुभाष गाडेकर, अमोल गुळवे, गंगाधर वेताळ, दत्तात्रय भालेरांव उपस्थित होते. प्रारंभी शेतकरी संघटनेचे शरद आसने यांनी प्रास्ताविक केले, तर भाऊसाहेब काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.