पिंपळगाव माळवी येथे महाबीज तूर ‘गोदावरी’चे पीक प्रात्यक्षिक

संगमनेर Live
0
पिंपळगाव माळवी येथे महाबीज तूर ‘गोदावरी’चे पीक प्रात्यक्षिक

◻️ कृषी विभाग व महाबीज संयुक्त उपक्रम; कृषिकन्यांचा उत्स्फूर्त सहभाग

संगमनेर LIVE (नगर) | पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथे महाबीज तूर ‘गोदावरी’ वाणाच्या पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमास वरिष्ठ अधिकारी, कृषी तज्ज्ञ आणि RAWE कार्यक्रमातील कृषिकन्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला.

कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज), अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळगाव माळवी येथे प्रगतशील शेतकरी प्रतापराव गणपतराव झिने यांच्या शेतावर महाबीज तूर ‘गोदावरी’ वाणाच्या पीक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे तर प्रमुख पाहुणे म्हणून राजाभाऊ मोराळे (विभागीय व्यवस्थापक, महाबीज जालना), दत्तात्रय डमाळे (उपविभागीय कृषी अधिकारी, अहमदनगर), प्रदीप लाटे (प्रकल्प समन्वयक, आत्मा), सुनील दौंड (जिल्हा व्यवस्थापक, महाबीज), नितीन दानवले (प्रमुख शास्त्रज्ञ, राहुरी) व अशोक वाळके (तालुका कृषी अधिकारी) उपस्थित होते.

यावेळी रविंद्र काळभोर, विजय सोमवंशी, श्रीमती माधवी घोरपडे, योगेश घोलप तसेच प्रगतशील शेतकरी प्रतापराव झिने यांची उपस्थिती नोंदवली गेली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचालित कृषी महाविद्यालय, विळदघाट येथील RAWE & AIA सत्र २०२५–२६ मधील कृषिकन्या अश्विनी मुळे, साक्षी मुठे, मानसी निमसे, प्रतीक्षा राऊत, साक्षी रोडे व किरण सावंतफुले यांनी प्राचार्य प्रा. डॉ. सोमेश्वर राऊत, प्रा. किरण दांगडे व प्रा. पूनम ठोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग नोंदवला.

कृषिकन्यांनी शेतकऱ्यांना ‘महाविस्तार AI’ अँपविषयी माहिती दिली. कृषि विभागाद्वारे विकसित हे आधुनिक डिजिटल व्यासपीठ शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव, तांत्रिक सल्ला व इतर कृषी सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देते, ज्यामुळे उत्पादनक्षमता आणि निर्णयक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !