“निधी मी आणतो आणि श्रेय दुसरेच घेतात“ - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
“निधी मी आणतो आणि श्रेय दुसरेच घेतात“ - आमदार अमोल खताळ

◻️ कासारा दुमाला येथे १ कोटी ३९ लाख रुपये किंमतीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ

◻️ निमगावजाळी शिवारात ‘बिबट सफारी पार्क’ उभारले जाणार

​संगमनेर LIVE | ​केंद्र आणि राज्यात आपल्या विचारांचे सरकार असून संगमनेरच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी विधानसभा आमदाराच्या माध्यमातूनच उपलब्ध होत आहे. पदवीधर आमदाराचे कार्यक्षेत्र मर्यादित असून जनतेने विकासनिधी आणणारा खरा लोकप्रतिनिधी ओळखावा, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील ​कासारा दुमाला येथे विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी नाव न घेता पदवीधर आमदार सत्यजीत तांबे यांच्यावर कडाडून टीका केली.

​संगमनेरमध्ये सध्या “निधी मी देतो आणि श्रेय दुसरेच घेतात” असा एक नवा कल सुरू झाला असल्याची खंत व्यक्त करत आमदार खताळ यांनी स्थानिक राजकारणातील श्रेयवादावर कडाडून प्रहार केला. महायुती सरकारच्या माध्यमातून गेल्या एका वर्षात तालुक्यासाठी मोठा निधी खेचून आणला असून, केवळ कासारा दुमाला गावासाठीच १ कोटी ३९ लाखांची विकासकामे मंजूर केली आहेत. 

पदवीधर आमदार सत्यजीत तांबे यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी आव्हान दिले की, जर त्यांनी संगमनेरला निधी दिला असेल, तर नाशिक, धुळे, जळगाव किंवा अहिल्यानगर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये त्यांनी किती निधी दिला याचा हिशोब द्यावा. पदवीधरांचे काम केवळ त्यांच्या क्षेत्रापुरते मर्यादित असताना विकासाचे श्रेय लाटणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

​आमदार खताळ म्हणाले की, “आज आमची लढाई धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची आहे. आमच्याकडे धनशक्ती नसली तरी जनतेचे प्रेम आणि पाठबळ आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये कोणत्याही दबावाला किंवा दहशतीला बळी न पडता गावाच्या विकासासाठी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.” असे आवाहन केले.

​“वनमंत्र्यांकडे जाऊन केवळ फोटो काढल्याने कामे होत नाहीत, तर त्यासाठी प्रत्यक्ष पाठपुरावा करून निधी खेचून आणावा लागतो. असा टोला लगावून तालुक्यातील बिबट्यांच्या वाढत्या त्रासावर कायमस्वरूपी उपाय म्हणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून निमगावजाळी शिवारातील दुधेश्वर नजीक वनविभागाच्या हद्दीत ‘बिबट सफारी पार्क’ उभारले जाणार असल्याची महत्त्वाची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.

दरम्यान याप्रसंगी सरपंच राजेंद्र त्रिभुवन, उपसरपंच अमोल वाळके, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रमेश काळे, शहरप्रमुख दिनेश फटांगरे, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, माजी उपसरपंच आशा काळे, संगीता पुंड, सपना जाधव, राष्ट्रवादी कॉग्रेसचे उपाध्यक्ष अशोक काळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बबन सालके, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय नाईक, तुळशीराम सातपुते, मच्छिंद्र सूर्यवंशी, नारायण शिंदे, अशोक सावंत, मच्छिंद्र सूर्यवंशी, दिलीप अनाप, स्वप्निल सातपुते, अशोक सावंत, अशोक जाधव, राजू गिते, सुनील सूर्यवंशी, बाळासाहेब माळी, पप्पू शिंदे, तुषार वाकचौरे, अभिषेक काळे, सचिन भरीतकर, अनिल भरीतकर, नारायण शिंदे, संतोष शिंदे, शांताराम गुंजाळ, स्वप्नील घेगडमल, जय घेगडमल, आदित्य गुंजाळ, केतन नन्नवरे, नितीन वाळके, धनंजय खतोडे, रवींद्र गुंजाळ, ग्रामपंचायत अधिकारी खैरनार आदी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !