मयत सिद्धेशच्या कुटुंबियांना ‘आर्थिक मदत आणि शासकीय नोकरी' द्या!

संगमनेर Live
0
मयत सिद्धेशच्या कुटुंबियांना ‘आर्थिक मदत आणि शासकीय नोकरी' द्या!

◻️ आमदार अमोल खताळ यांची जवळे कडलग घटनेनंतर विधिमंडळात सरकारकडे मागणी 

संगमनेर LIVE | ​संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यात अवघ्या चार वर्षांच्या सिद्धेश कडलग या बालकाचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण असताना, या हृदयद्रावक घटनेनंतर आमदार अमोल खताळ यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून नागपूर विधिमंडळात हा अत्यंत नाजूक प्रश्न मांडत राज्य सरकारचे तातडीने लक्ष वेधले आणि कुटुंबासाठी तत्काळ मदतीची मागणी केली.

​शनिवारी जवळे कडलग येथील कडलग वस्तीवर ही दुर्देवी घटना घडली. चार वर्षाचा सिद्धेश सूरज कडलग हा घराच्या जवळ खेळत असताना, गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या नरभक्षक बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यामुळे सिद्धेशच्या गळ्यावर आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

​सिद्धेशचे कुटुंब शेती आणि दुग्धव्यवसायावर आपला उदरनिर्वाह करते. घटनेच्या वेळी कुटुंबातील सदस्य शेतात पाणी भरण्याच्या कामात व्यस्त होते. या अत्यंत दुःखद घटनेमुळे संपूर्ण जवळे कडलग परिसरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

​या गंभीर घटनेची दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी विधिमंडळा सरकारच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यांनी मयत बालकाच्या कुटुंबाची अत्यंत नाजूक आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने सिद्धेशच्या कुटुंबियांना तातडीने आणि पुरेशी आर्थिक मदत जाहीर करावी, कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत समावेश करण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा, मयत बालकाचे आधार कार्ड नसल्यामुळे, नुकसान भरपाई मिळण्याच्या प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी, मानवी वस्तीत येऊन हल्ला करणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे तत्काळ आदेश द्यावेत आणि वन विभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्यांना जेरबंद करावे आणि मानवी वस्तीतून दूर ठेवावे. अशा महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

दरम्यान ​आमदार खताळ यांनी याप्रसंगी नरभक्षक बिबट्यावर तातडीने कारवाईचे आदेश दिल्याबद्दल वनमंत्री गणेश नाईक, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तसेच राज्याचे वनाधिकारी विवेक खांडेकर व एम. एस. रेड्डी यांचे आभार मानले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कोणतीही हयगय करू नये, अशी त्यांनी आग्रही भूमिका घेतल्याचे यावेळी पहावयास मिळाले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !