मंत्री विखेंनी घेतली राजूरच्या सिध्देशच्या शिक्षणाची जबाबदारी
◻️ जामखेडच्या विज्ञान प्रदर्शनात राजूर येथील दिव्यांग विद्यार्थ्याचा केला सन्मान!
संगमनेर LIVE (लोणी) | विज्ञान प्रदर्शनात राज्यस्तरावर दोनवेळा विजेता ठरलेला राजूर येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी सिध्देश हंगेकर याच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी प्रवरा ग्रामिण शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्याची ग्वाही जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या वतीने जामखेड येथील श्री नागेश विद्यालयात जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनाच्या पारितोषिक वितरण समारंभात मंत्री डाॅ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते राजूर येथील श्री. स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी सिध्देश संतोष हंगेकर यास पारितोषिक देण्यात आले. मिळालेले बक्षीस घेण्यासाठी व्हिलचेअरवर आलेल्या सिध्देश हंगेकर याला पाहून मंत्री विखे पाटील थेट स्टेजवरून खाली उतरून आले. अतिशय संवेदनशीलतेने त्यांनी सिध्देशची चोकशी केली. मिळालेले बक्षीस सन्मानपुर्वक त्यास प्रदान केले.
मंत्री विखे पाटील यांनी सिध्देश याच्याशी संवाद साधून त्याची संपूर्ण चौकशी करून कौटुंबिक माहिती जाणून घेतली. त्याच्या शिक्षणाच्या बाबतीत सुध्दा सर्व परीस्थीती बरोबर असलेल्या यापुर्वी राज्यस्तरीय गणित विज्ञान स्पर्धेत दोनवेळा पारितोषिक मिळविले असल्याची माहीती मिळाल्याचा त्यांनी अभिमान व्यक्त केला.
अतिशय आव्हनात्मक परीस्थितीत असलेल्या शारीरीक दिव्यंगात्वर मात करून सिध्देश सिध्द करून दाखवित असलेल्या स्वतामधील गुणवतेची पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी दखल करून त्याच्या पुढील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था घेईल असे सर्वासमोर जाहीर केले.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, माध्यमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी श्रीमती संध्या गायकवाड, प्राथमिकचे भास्कर पाटील, विनायकराव देशमुख यांच्यासह पदाधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते.