उद्या बुधवारी नेवासा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन
◻️ जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहायक आयुक्त रविकुमार पंतम यांची माहिती
◻️ ११ नामांकित कंपन्यांसह १० शासकीय महामंडळे होणार सहभागी
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्या बुधवार दि. २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालय, ज्ञानेश्वरनगर (भेंडे), ता. नेवासा येथे ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रविकुमार पंतम यांनी केले आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील ११ नामांकित कंपन्यांचे उद्योजक व १० शासकीय महामंडळे सहभागी होऊन प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करणार आहेत. सर्व शाखांतील पदवीधर, तसेच पदविका (Diploma) व पदवी (Degree) धारक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर तसेच https://forms.gle/CDMcrNKWzDNpAbrL9 या लिंकवर नोंदणी करून पात्रतेनुसार उद्योजकांकडे अर्ज करावा.
याबाबत अधिक माहितीसाठी वसीमखान भ्रमणध्वनी क्र. ९४०९५५५४६५, संतोष वाघ ८८३०२१३९७६, बद्रीनाथ आव्हाड ९४२०७२५२८०, योगेश झांजे ९५८८४०८८९० अथवा कार्यालयाच्या ०२४१-२९९५७३५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.