राजकारणापलिकडे जावून विचार करणारा मित्र गमावला!
◻️ अजितदादा पवार यांना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील श्रध्दांजली केली अर्पण
संगमनेर LIVE (शिर्डी) | राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची घटना अत्यंत वेदनादायी असून, राजकारणापलिकडे जावून विचार करणारा एक मित्र आपण गमावल्याची भावना जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
आपल्या शोकसंदेशात मंत्री विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेतील अनेक आठवणीना उजाळा देताना, गेली अनेक वर्षे विधीमंडळात आणि राज्याच्या मंत्रीमंडळात त्यांच्या समवेत काम कारण्याची संधी मिळाली. राज्याच्या विकासात्मक बाबतीत अनेकवेळा एकत्रित बसून आम्ही निर्णय केले. जे होईल त्यालाच पुढे घेवून जाण्याचा एक स्वभाव होता. स्पष्टवक्तेपणा असला तरी, मनाने अतिशय प्रेमळ आणि विकासात्मक दृष्टीकोन ठेवून सर्वाना बरोबर घेवून जाण्याची हातोटी त्यांची होती.
कामात अतिशय वक्तशीरपणा आणि प्रशसानातील शिस्तीला त्यांचे नेहमीच प्राधान्य राहीले. सकाळी लवकर उठून रात्री उशिरापर्यत काम करण्याची पध्दत होती. समोरचा माणूस सत्तेतील की विरोधी याचा विचार न करता कामाच्या माध्यमातून सहकार्य करण्याची भूमिका अजिदादांची नेहमीच राहिली.
अहिल्यानगरच्या विकासात्मक प्रक्रीयेत त्यांचे नेहमीच सहकार्य मिळाले. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत लोणी बुद्रुक गावात पद्मश्रीं डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि खासदार साहेबांच्या पुतळा अनावरण समारंभास त्यांची उपस्थिती ही आमच्या परीवारासाठी सदैव आठवणीत राहाणारा क्षण होता.
राजकारणातील एक अनुभव संपन्न नेत्तृत्व अजितदादांच्या रुपाने राज्याने गमावले असून, कधीही भरून न येणारी हानी या दुर्देवी घटनेनं राजकीय सामाजिक क्षेत्राची झाली आहे. एक मित्र गेल्याचे दु:ख मोठे असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.