एकरुखे शाळेत इंटरअ‍ॅक्टीव्ह बोर्ड व नवीन वर्ग खोल्यांचे लोकार्पण!

संगमनेर Live
0
एकरुखे शाळेत इंटरअ‍ॅक्टीव्ह बोर्ड व नवीन वर्ग खोल्यांचे लोकार्पण!

◻️ मंत्री विखे पाटील यांच्याकडून गणित-विज्ञान प्रदर्शनासाठी १ कोटींचा अतिरिक्त निधी!


संगमनेर LIVE (राहाता) | शिक्षक आणि पालकांनी संधी निर्माण करून दिल्यास जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी गुणवता प्राप्त करू शकतात. जिल्हास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शानाच्या अनुदानात १ कोटी रुपयांची वाढ केल्याने विद्यार्थ्यामधील संशोधन वृतीला अधिक पाठबळ मिळेल असा विश्‍वास जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

राहाता तालुक्यातील एकरूखे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध झालेल्या सुमारे ७४ लाख रुपयांच्या निधीतून चार वर्ग खोल्याचे तसेच इंटरअ‍ॅक्टीव्ह बोर्डचे उद्घाटन आणि ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी श्रेयस नालकर याची इस्रो सहलीसाठी निवड झाल्याबद्दल तसेच अन्य गुणवता प्राप्त विद्यार्थ्याचे मंत्री विखे पाटील यांनी अभिनंदन केले.

ग्रामीण आणि शहरी आशी स्पर्धा आता राहीलेली नाही. आपल्या बुध्दीकौशल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी आता चांगली प्रगती करून पुढे येत आहेत. आपल्या तालुक्याची शैक्षणिक गुणवता चांगल्या पध्दतीने राखली जात असल्याचे समाधान व्यक्त करून विद्यार्थ्याच्या शिक्षणात कोणतीही अडचण येवू नये असा प्रयत्न आपला असतो.

आज अनेक विद्यार्थी गणित विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून आपली गुणवता सिध्द करून दाखवत आहेत. या विद्यार्थ्याना अधिक संधी मिळाव्यात म्हणून यंदाच्या वर्षापासून प्रदर्शानाच्या अनुदानात एक कोटी रुपयांची वाढ आपण केली असून विद्यार्थ्यां मधील संशोधन वृतीला अधिक चालना देण्याकरीता वैज्ञानिक सहली करीता सुध्दा निधीची तरतूद जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यातून करणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

तालुक्यातील गावांच्या विकास प्रक्रीयेला योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देत असतो. विकास प्रक्रीया निरंतरपणे सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी गावातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अधिक पुढाकार घेण्याची अपेक्षा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !