नेवासा पोलिसांकडून गावठी पिस्तूलसह ४.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर Live
0
नेवासा पोलिसांकडून गावठी पिस्तूलसह ४.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

◻️ कुकाणा परिसरात पोलिसांनी सापळा रचून​ आरोपीला केले जेरबंद 


संगमनेर LIVE (​नेवासा) | नेवासा पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करत एका २२ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल, ३ जिवंत काडतुसे, एक मॅगझीन आणि एक मालवाहू गाडी असा एकूण ४ लाख ५० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संतोष नरोटे (पाथर्डी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

​१४ फेब्रुवारी २०२६ रोजी नेवासा पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. कुकाणा गावात नेवासा फाटा ते शेवगाव रोडवर एका मालवाहू गाडीत एक तरुण पिस्तूल घेऊन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस हवालदार शहाजी आंधळे यांना मिळाली होती.

​मिळालेली माहिती तत्काळ वरिष्ठांना कळवल्यानंतर, कुकाणा दूरक्षेत्राचे पोलीस पथक आणि होमगार्ड यांनी तरवडी चौकात सापळा रचला. संशयास्पद मालवाहू वाहन चौकात येताच पोलिसांनी त्याला अडवले. चालकाची अंगझडती घेतली असता, त्याच्या कंबरेला मॅगझीनसह एक देशी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. मॅगझीनची तपासणी केली असता त्यात ३ जिवंत काडतुसे आढळली.

​या धडक कारवाईत पोलिसांनी दीड लाख रुपये किमतीचे स्टील धातूचे व ब्राऊन रंगाची ग्रीप असलेले गावठी बनावटीचे पिस्तूल, ९०० रुपये किमतीची तीन जिवंत काडतुसे आणि तीन लाख रुपये किमतीची मालवाहू गाडी असा एकूण ४ लाख ५० हजार ९०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपीने हे शस्त्र बेकायदेशीरपणे जवळ बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

​आरोपी संतोष नरोटे याच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १११/२०२६ नुसार शस्त्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अमोल पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक अहिरे, पोलीस हवालदार शहाजी आंधळे, पोलीस शिपाई अमोल डमाळे, संदीप ढाकणे, होमगार्ड बाळु सावंत, होमगार्ड प्रशांत चव्हाण, होमगार्ड चंद्रकांत घाडगे, होमगार्ड श्रीधर लियणे यांच्या पथकाने केली. 

तर, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार करत आहेत. अशी माहिती पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांनी कळवली आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !