खांडगाव आता धार्मिक पर्यटनाचे मोठे केंद्र - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
खांडगाव आता धार्मिक पर्यटनाचे मोठे केंद्र - बाळासाहेब थोरात

​◻️ महाशिवरात्रीनिमित्त खांडेश्‍वर येथे भाविकांची मांदियाळी 


​संगमनेर LIVE | सरकारच्या माध्यमातून मिळालेला भरीव निधी आणि ग्रामस्थांची मिळालेली साथ, यामुळे खांडगाव परिसर व मंदिर सुशोभीकरण पूर्ण झाले असून, हे गाव आता धार्मिक पर्यटनासाठी एक मोठे तीर्थस्थळ म्हणून नावारूपास आले आहे, असे प्रतिपादन कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

​महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर बाळासाहेब थोरात यांनी खांडगाव येथील ऐतिहासिक खांडेश्‍वर मंदिरात विधिवत पूजा व अभिषेक केला. त्यानंतर त्यांनी कपारेश्‍वर येथेही दर्शन घेऊन उपस्थितांशी संवाद साधला.

​यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, “महाशिवरात्री हा शिवभक्तीचा अत्यंत पवित्र उत्सव आहे. खांडेश्‍वर आणि कपारेश्‍वर मंदिराच्या विकासासाठी आम्ही सातत्याने निधी उपलब्ध करून दिला. आज या ठिकाणी भाविकांसाठी सर्व सोयीसुविधा निर्माण झाल्या आहेत. विशेष म्हणजे, या विकासकामांत गावकऱ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्याने हा परिसर अधिक देखणा झाला आहे.”

​केवळ धार्मिक विधीच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी म्हणूनही या परिसराचा विकास झाला आहे. येथील सुशोभीकरण आणि विस्तारित सुविधांमुळे गोरगरीब कुटुंबातील मुला-मुलींच्या विवाहासाठी एक उत्तम आणि परवडणारे ठिकाण निर्माण झाले आहे. निसर्गरम्य, शांत आणि प्रसन्न वातावरणामुळे भाविकांची येथे वर्षभर मोठी वर्दळ असते.
​दर्शनानंतर बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील बळीराजा, कष्टकरी जनता आणि सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदावी, यासाठी महादेवाकडे प्रार्थना केली.

दरम्यान ​याप्रसंगी परिसरातील अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. संपूर्ण खांडगाव परिसरात शिवभक्तीचा आणि उत्साहाचा ओसंडून वाहणारा उत्साह पाहायला मिळाला.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !