विखे पाटील नर्सिग महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

संगमनेर Live
0
विखे पाटील नर्सिग महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी 

◻️ ​संगीत नाटिका आणि व्याख्यानातून उलगडला छत्रपतींचा गौरवशाली इतिहास

संगमनेर LIVE ​(अहिल्यानगर) | हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिगमध्ये १९ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘शिवजयंती महोत्सव’ अत्यंत उत्साहपूर्ण आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

​कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व भावपूर्ण आरतीने झाली. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेली महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित संगीतमय नाटिका. या नाटिकेतून महाराजांचे शौर्य, स्वराज्य स्थापनेचा संघर्ष, गनिमी कावा, प्रशासन कौशल्य आणि त्यांची अतूल्य राष्ट्रनिष्ठा प्रभावीपणे मांडण्यात आली, ज्याने उपस्थितांची मने जिंकली.

​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अभिजीत दिवटे व डॉ. रामचंद्र पडळकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे आणि व्याख्याते डॉ. तुषार बाहेकर यांनी शिवरायांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना सांगितले की, “महाराजांचे नेतृत्व केवळ युद्धभूमीपुरते मर्यादित नव्हते, तर त्यांचे स्त्री-सन्मानाचे धोरण आणि लोकाभिमुख प्रशासन ही आजच्या काळातील व्यवस्थापनाची मोठी शिकवण आहे.” आजच्या तरुण पिढीने महाराजांच्या आदर्शाचा अंगीकार करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

​या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा चांदेकर व उपप्राचार्या डॉ. योगिता औताडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रा. अमोल टेमकर आणि सहाय्यक प्राध्यापक स्वप्निल म्हस्के यांनी कार्यक्रमाच्या संयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

​यावेळी महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणांनी आणि भगव्या वातावरणाने न्हाऊन निघाला होता. मोठ्या संख्येने उपस्थित असलेले प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यानी हा सोहळा यशस्वी केला.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !