पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या मूळ मार्गाचा फेरविचार होणार

संगमनेर Live
0
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या मूळ मार्गाचा फेरविचार होणार

◻️ नामदार विखे पाटील यांच्या भेटीनंतर रेल्वे मंत्र्यांची ग्वाही!


संगमनेर LIVE | पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयाचा निश्चित फेरविचार करू आशी ग्वाही केंद्रीय रेल्वे मंत्री आश्‍विनी वैष्णव यांनी जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना दिली.

पुणे-नाशिक रेल्वे मार्गासंदर्भात मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी संसद भवनात रेल्वे मंत्री आश्‍विनी वैष्णव यांची भेट घेवून हायस्पीड रेल्वेच्या प्रस्तावीत मार्गामध्ये बदल करण्याच्या रेल्वे विभागाच्या निर्णयाबाबत सविस्तर चर्चा केली.

प्रस्तावित रेल्वे प्रकल्पाचा मार्ग  नारयणगाव, संगमनेर, अकोले, सिन्नर आशा पध्दतीने निश्चित करण्यात आला होता. मात्र यामध्ये केलेल्या बदलामुळे संगमनेर-अकोले तालुक्यातील लोकप्रतिनी तसेच नागरीकांमध्ये नाराजी व्यक्त झाली असून, रेल्वे विभागाच्या नव्या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू झाल्याची बाब मंत्री विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री आश्‍विनी वैष्णव यांच्या निदर्शनास भेटी दरम्यान आणून दिले.

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या बाबतीत लोकप्रतिनिधी तसेच नागरीकांची असलेली मागणी विचारात घेवून निर्णय व्हावा आशी भूमिका मंत्री विखे पाटील यांनी भेटी दरम्यान मांडली .रेल्वे मार्गाच्या संदर्भात झालेल्या बदला बाबत दोघा मंत्र्यामध्ये  झालेल्या चर्चेनंतर नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या बाबतीत झालेल्या निर्णयाचा फेरविचार करण्याबबात मंत्री वैष्णव यांनी आश्‍वासित केले.

पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचा आराखडा तयार करताना पुणे, नारायणगाव, संगमनेर, अकोले, सिन्नर आशा पध्दतीने करण्यात आला. मात्र यामध्ये बदल करताना कोणत्याही लोकप्रतिनिधींना विचारात घेण्यात आले नसल्याचे गांभीर्य मंत्री विखे पाटील यांनी रेल्वे मंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले. प्रस्तावित मार्गात बदल करण्यात आल्याने संगमनेर-अकोले तालुक्यात लोकप्रतिनिधी आणि नागरीकात निर्माण झालेले संभ्रमाचे वातावरण दूर होण्याकरीता रेल्वे मार्ग पहील्या प्रकल्प आरखड्या नुसारच करण्याचा आग्रह मंत्री विखे पाटील यांनी या बैठकीत धरला.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !