श्री क्षेत्र कपारेश्‍वर देवस्थानला ‘क’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

संगमनेर Live
0
श्री क्षेत्र कपारेश्‍वर देवस्थानला ‘क’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

◻️ आमदार अमोल खताळ यांचे विश्‍वस्त मंडळाला भरीव निधीचे आश्‍वासन


​संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील जागृत श्रद्धास्थान श्री क्षेत्र कपारेश्‍वर देवस्थानच्या विकासासाठी आमदार अमोल खताळ यांनी सकारात्मक पाऊल उचलले आहे. देवस्थान ट्रस्टच्या विश्‍वस्त मंडळाने नुकतीच आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी आमदारांनी देवस्थानच्या प्रलंबित विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले.

​या भेटीदरम्यान विश्‍वस्त मंडळाच्या वतीने आमदार अमोल खताळ यांचा सत्कार करण्यात आला. आगामी महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या विशेष आरतीचा मान स्वीकारण्याचे आमंत्रण विश्‍वस्त मंडळाने दिले, जे आमदारांनी स्वीकारले. यामुळे खांडगाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

​ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष सोमनाथ किसन गुंजाळ यांनी कपारेश्‍वर महादेव देवस्थानाच्या सर्वागीण विकासासाठी भरीव निधीची मागणी आमदारांकडे केली. यावेळी झालेल्या सविस्तर चर्चेत देवस्थान परिसरात भाविकांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सोयी-सुविधांची उभारणी करणे, तीर्थक्षेत्राचा परिसर सुशोभित करणे आणि गावातील विविध प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यावर भर देण्यात आला. विशेष म्हणजे, या देवस्थानचा समावेश 'क' वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मध्ये करण्यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. यामुळे देवस्थानच्या भविष्यातील विकासाला मोठी गती मिळणार आहे.

​"गावची अस्मिता असलेल्या श्रद्धास्थानांचा विकास आणि गावाचा सर्वागीण कायापालट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. कपारेश्‍वर देवस्थानसाठी आवश्यक तो निधी प्राधान्याने उपलब्ध करून दिला जाईल," असे आश्‍वासन आमदार अमोल खताळ यांनी यावेळी दिले. श्रद्धास्थानांचा विकास आणि गावाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान ​या भेटीवेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सोमनाथ गुंजाळ, सचिव रामनाथ गुंजाळ, विश्‍वस्त सुनील बालोडे, दत्तू गुंजाळ, पांडुरंग गुंजाळ, नामदेव गुंजाळ, तानाजी गुंजाळ, गोपीनाथ बालोडे, रघुनाथ गुंजाळ, बादशाह गुंजाळ, सुनील रुपवते, विकास अरगडे, रोहिदास गुंजाळ यांसह अनेक ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !