मराठा तरुणांनी आता ‘नोकरी मागणारे’ नव्हे, तर ‘नोकरी देणारे’ बनावे!

संगमनेर Live
0
मराठा तरुणांनी आता ‘नोकरी मागणारे’ नव्हे, तर ‘नोकरी देणारे’ बनावे!

◻️​ पुण्यातील बिझनेस एक्स्पोला मंत्री विखे पाटील यांची सदिच्छा भेट


संगमनेर LIVE (पुणे) | मराठा उद्योगजक असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बिझनेस एक्स्पोला जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. मराठा समाजातील युवकांना उद्योग क्षेत्रात सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.


मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक्स्पो मधील अनेक स्टाॅलला भेट देवून उत्पादन तसेच निर्मिती क्षेत्रातील नाविन्याची माहीती घेतली. नवे तंत्रज्ञानाचा वापर स्टार्टअप्सच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि बाजारपेठेतील आढावा त्यांनी भेटी दरम्यान जाणून घेतला.

एक्स्पोला उद्योजकांचा  मिळालेला प्रतिसाद पाहाता राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रासाठी निर्माण होत असलेल्या सकारात्मक वातावरणाचा प्रभाव एक्स्पो मध्ये पाहायला मिळाल्याचे समाधान मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात घेण्यात येत असलेली उद्योगस्नेही धोरण गुंतवणुकीस निर्माण होत असलेले पोषक वातावरण आणि उद्योजकांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात दिले गेलेले प्राधान्य यामुळे आपले राज्य उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकीसाठी महत्वपूर्ण केंद्र ठरत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मराठा समाजातील युवकांनी नोकरी देणारे बनावे हा काळाचा संदेश आहे. यासाठी मार्गदर्शन कौशल्य विकास आणि उद्योगासाठी भांडवलाची उपलब्धता यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. सारथी संस्थेच्या माध्यमातून युवकांना शिक्षण प्रशिक्षण आणि उद्योगासाठी लागणारे मार्गदर्शन देण्यासाठी सुरू आहे. 

औद्यगिक व सेवा क्षेत्राला आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी सारथी संस्थेने उद्योजकांच्या संघटनांशी समन्वय ठेवून प्रशिक्षणाचे कार्यक्रम सुरू करावेत आशा सूचना नुकत्याच झालेल्या बैठकीत आपण दिल्या असल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !