सात्रळच्या ‘आनंद गुरुकुल’मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

संगमनेर Live
0
सात्रळच्या ‘आनंद गुरुकुल’मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन 

◻️​ राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन

संगमनेर LIVE (​सात्रळ) | जागतिक विज्ञान दिनाचे औचित्य साधून राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील आनंद गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्याच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देणारे भव्य विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रदर्शनाचे अधिकृत उद्घाटन राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल बोरा, प्राचार्या श्रीमती प्रधान, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​प्रदर्शनाच्या सुरुवातीला मान्यवरांनी विद्यार्थ्याच्या विविध प्रकल्पांची पाहणी केली. विद्यार्थ्यानी ऊर्जासंवर्धन, पर्यावरण संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि दैनंदिन जीवनातील विज्ञानावर आधारित कल्पक मॉडेल्स तयार करून त्यांचे सादरीकरण केले. केवळ वैज्ञानिक प्रकल्पांपुरते मर्यादित न राहता, या प्रदर्शनात ऐतिहासिक किल्ले, विविध कलाकृती आणि आकर्षक रांगोळींचेही सुंदर प्रदर्शन मांडण्यात आले होते. विज्ञान, इतिहास आणि कला यांचा हा त्रिवेणी संगम विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाचे दर्शन घडवणारा ठरला.

​प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी विद्यार्थ्याच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक केले. “विज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसून प्रयोग, निरीक्षण आणि कल्पकतेतून घडणारी प्रक्रिया आहे,” असे मत त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्यातील वैज्ञानिक विचारसरणीला योग्य दिशा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

​या प्रदर्शनास पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत विद्यार्थ्याच्या सृजनशीलतेचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यानी आपल्या प्रकल्पांमागील संकल्पना, उपयोग आणि समाजोपयोगी पैलू ज्या आत्मविश्‍वासाने मान्यवरांना समजावून सांगितले, त्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. आनंद गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलने या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षणासोबतच प्रयोगशीलता आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्याची आपली शैक्षणिक परंपरा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

दरम्यान ​शिक्षण आणि प्रयोगांची सांगड घालणारा हा उपक्रम सात्रळ परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !