राहत्यात कॉग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावरील हल्ल्याचा निषेध!

संगमनेर Live
0
राहत्यात कॉग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावरील हल्ल्याचा निषेध!

◻️ ​दोषींवर कठोर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन; तालुका कॉग्रेस कमिटीचा इशारा


संगमनेर LIVE (​राहाता) | कॉग्रेस पक्षाचे अधिकृत प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद आता संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात उमटू लागले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ राहाता तालुका कॉग्रेस कमिटीच्या वतीने राहाता पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

​राहाता पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक सौ. संगीता गिरी यांना देण्यात आलेल्या निवेदनात कॉग्रेसने प्रशासनाकडे आपली भूमिका स्पष्ट केली. लोकशाही व्यवस्थेत वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु त्या मतभेदांना हिंसेच्या मार्गाने उत्तर देणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे. हा केवळ एका व्यक्तीवर झालेला हल्ला नसून, तो लोकशाहीची मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेला थेट आघात आहे. या प्रकरणामागे राजकीय द्वेषातून प्रेरित काही गुंड प्रवृत्तीच्या घटकांचा हात असल्याची जनतेत तीव्र भावना असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

​निवेदन देताना राहाता तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. पंकज लोंढे म्हणाले की, “हनुमंत पवार हे पक्षाचे लढवय्ये नेते आहेत आणि त्यांच्या पाठीशी संपूर्ण कॉग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करून लोकशाही मूल्यांचे संरक्षण करावे.” अशी मागणी केली.

शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले यांनीही सांगितले की, “लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, त्यावर हल्ला करणे म्हणजे लोकशाहीची गळचेपी आहे. अशा भ्याड कृत्यांना कॉग्रेस पक्ष कदापि सहन करणार नाही, दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”

​या प्रसंगी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते उत्तमराव मते, ज्ञानेश्वर वर्पे, राजेंद्र निर्मळ, अमोल आरणे, मुन्नाभाई फिटर, अनिश शेख आदींसह कॉग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !