सात्रळ येथील ‘वैभव कोचिंग क्लासेस’च्या विद्यार्थ्याचे जेईई परिक्षेत नेत्रदीपक यश!
◻️ अथक परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी मारली बाजी
संगमनेर LIVE (सात्रळ) | राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आणि विद्यार्थ्यामध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘वैभव कोचिंग क्लासेस’ ने पुन्हा एकदा आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे घेण्यात आलेल्या जेईई मुख्य परीक्षेचा (JEE Main) निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात क्लासेसच्या विद्यार्थ्यानी आपल्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे.
आव्हानात्मक असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत चि. सार्थक चांगदेव साबळे याने ९५.३७ टक्के गुण, चि. सार्थक जालिंदर हारदे याने ८४.४७ टक्के गुण आणि चि. ओम संदीप अनाप याने ८२.३१ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. या तिन्ही विद्यार्थ्यानी मिळवलेल्या या 'वैभव'शाली यशामुळे केवळ क्लासेसचेच नव्हे, तर संपूर्ण सात्रळ परिसराचे नाव शैक्षणिक पटलावर उज्ज्वल झाले आहे.
विद्यार्थ्याच्या या यशामागे त्यांनी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि त्यांना लाभलेले तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले. या यशासाठी विद्यार्थ्याना प्रा. सतीश वाणी, प्रा. अवधूत खळदकर, प्रा. डोळे तसेच शिक्षिका श्रीमती हारदे आणि श्रीमती वाणी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान ग्रामीण भागात राहूनही योग्य दिशा आणि जिद्द असेल तर राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेतही गगनभरारी घेता येते, हे या विद्यार्थ्यानी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवले आहे. या यशाबद्दल सर्व स्तरांतून विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.