पानेगांव-मांजरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी
◻️ छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी तीन तालुक्यांतील शिवप्रेमींची गर्दी
संगमनेर LIVE (नेवासा) | अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती नेवासा तालुक्यातील पश्चिम भाग आणि राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील मुळाथडी परिसरात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. विशेषतः पानेगांव-मांजरी येथे शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन व दर्शनासाठी नेवासा, राहुरी आणि श्रीरामपूर या तीनही तालुक्यांतून शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवस्मारक समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने स्मारक परिसरात आकर्षक सुशोभीकरण, रंगरंगोटी आणि अद्यावत विद्युत रोषणाई करण्यात आली होती, ज्यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. उत्सवाच्या दिवशी सकाळी गोणेगांव रामकृष्ण आश्रमातील ह.भ.प. भगवान जंगले शास्त्री यांच्या हस्ते विधिवत पूजन आणि शिवरायांची आरती संपन्न झाली.
यावेळी शालेय विद्यार्थ्यानी साकारलेले विलोभनीय शिवकालीन देखावे. मांजरी येथील चंद्रागिरी महाराज माध्यमिक विद्यालय तसेच मांजरी आणि पानेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यानी या उत्सवात हिररीने सहभाग नोंदवला. अनेक विद्यार्थ्यानी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश परिधान केला होता, तर काही विद्यार्थी मावळ्यांच्या पोशाखात सज्ज झाले होते. घोड्यावरून काढण्यात आलेल्या या भव्य मिरवणुकीने आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
याप्रसंगी संजय जंगले, रामभाऊ जंगले, डॉ. जयवंत गुडधे, सतिश जंगले, हौशाबापू जंगले, सुरज जंगले, सुभाष गुडधे, अनिल जंगले, संदिप जंगले, डॉ. कडूबाळ काकडे, वसंतराव जंगले, लक्ष्मीकांत जंगले, बाबासाहेब गुडधे, संकेत गुडधे, गणेश जंगले, भारत जंगले, कोंडाजी विटनोर, डॉ. अमोल विटनोर, प्रमोद विटनोर, नानासाहेब तुवर, संजय सुखधान, बाळासाहेब पवार, दिगंबर जाधव, कर्णासाहेब जाधव, किरण जाधव, रत्नाकर बोर्डे, सतिश फुलसौंदर, बाळासाहेब पाटील, अशोक मोरे, ज्ञानेश्वर आयनर, संतोष पवार, कैलास जाधव, गणेश डोंगरे, भाऊसाहेब विटनोर, नानासाहेब जुंधारे, निकीता भोसले, बबनराव जंगले, गणेश पाखरे, उद्धव चिंधे, ज्ञानेश्वर जंगले, रमेश गुडधे, राजेंद्र जंगले, अशोक गागरे, रंगनाथ जंगले, ज्ञानेश्वर जंगले, संजय वाघमारे, भाऊसाहेब वाघमारे, सुरेंद्र जंगले, रविंद्र सोनवणे भाऊसाहेब काकडे, नानासाहेब जंगले, प्रविण जंगले आदीसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून लोकनेते सुनीलभाऊ गडाख पाटील मित्र मंडळाच्या वतीने विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे नेटके आयोजन करण्यात आले होते. मुळाथडी परिसरातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांच्या चरणी नतमस्तक होत अभिवादन केले. अशी माहिती पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांनी कळवली आहे.