हर्षवर्धन सपकाळांच्या ‘वादग्रस्त' विधानाचे संगमनेरात तीव्र पडसाद

संगमनेर Live
0
हर्षवर्धन सपकाळांच्या ‘वादग्रस्त' विधानाचे संगमनेरात तीव्र पडसाद

◻️ महायुतीच्या कार्यकर्त्यानी सपकाळांची प्रतिमा तुडवून केला निषेध


​संगमनेर LIVE | कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी केल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये सोमवारी (दि. १६) संतापाची लाट उसळली. आमदार अमोल खताळ आणि शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यानी संगमनेर बसस्थानक परिसरात एकत्र येत सपकाळ यांच्या वादग्रस्त विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यानी सपकाळ यांची प्रतिमा पायदळी तुडवून आपला संताप व्यक्त केला.

​मालेगाव महापालिकेत कॉग्रेसचा उपमहापौर झाल्यानंतर त्यांच्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला होता. यावेळी बोलताना कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी “छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे समकक्ष होते”, असे विधान केले होते. या विधानामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत महायुतीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

​आंदोलनाची सुरुवात करण्यापूर्वी शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विजयाच्या घोषणा देत तसेच ‘जय भवानी जय शिवाजी’च्या जयघोषाने संपूर्ण बसस्थानक परिसर दणाणून सोडला.

यावेळी कार्यकर्त्याचा संताप अनावर झाला होता, त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमा पायदळी तुडवून आपला निषेध नोंदवला.

​दरम्यान या आंदोलनात सौ. नीलम खताळ, पायल ताजणे, विनोद सूर्यवंशी, सौरभ देशमुख, सुशील शेवाळे, रोहित चौधरी, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, संगीता पुंड, कैलास कासार, दीपाली वाव्हळ, मेघना जेधे, अजित जाधव, प्रवीण कर्पे, सीताराम पानसरे, सनी धारणकर, कृष्णा हासे, तुषार ठाकूर, शशांक नामन, विकास पुंड, प्रवीण दिड्डी, मुकेश मुर्तडक, अवधूत आहेर, वरद बागुल, महेश मांडेकर, भारत गवळी, आशिष कानवडे, संकेत खुळे, लाला दायमा, भैय्या सातपुते, संदेश देशमुख, सुरेश लांडगे, मुकेश मुर्तडक, अनिल चव्हाण यांच्यासह शिवसेना महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !