म्हैसगाव ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या जयघोषाने दुमदुमले!

संगमनेर Live
0
म्हैसगाव ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या जयघोषाने दुमदुमले!

◻️ शिस्तबध्द ​मिरवणूक आणि सुश्राव्य कीर्तनाने रंगला सोहळा


संगमनेर LIVE (​म्हैसगांव) | राहुरी तालुक्यातील म्हैसगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. गावातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात करण्यात आली.

​सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली ती श्री केदारेश्वर मंदिर परिसरातून निघालेली भव्य मिरवणूक. ट्रॅक्टरच्या ट्रेलरवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची अत्यंत आकर्षक सजावट करण्यात आली होती. विशेष म्हणजे, एका युवकाने महाराजांचे रूप धारण केले होते, जे सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. सायंकाळी ४.३० वाजता मंदिरापासून सुरू झालेली ही मिरवणूक गावात दाखल झाली. “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.

​मिरवणुकीनंतर ह.भ.प. दादा रंजाळे यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले. त्यांच्या कीर्तनातून शिवरायांच्या जीवनातील विविध पैलू उलगडण्यात आले. कीर्तनानंतर सर्व ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

​या सोहळ्याप्रसंगी सरपंच सुजाता अरुण पवार, उपसरपंच शिवाजी बर्डे, सदस्य भिमा दुधाट, डॉ. शशिकांत गागरे यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेसचे विलास गागरे, माजी सरपंच महेश गागरे, तंटामुक्ती अध्यक्ष गहिनीनाथ हुलुळे, सोसायटीचे चेअरमन नानासाहेब गागरे, सचिन गागरे, सोमनाथ जाधव, दत्तू गागरे, पत्रकार कमलेश विधाटे, पत्रकार सुभाष आग्रे, शशिकांत विधाटे, प्रकाश यादव, चांगदेव चोपडे, बाबासाहेब गागरे, सुखदेव दुधाट, अशोक नेहे, पुंजा मुसळे, गणपत मुसळे, पांडुरंग गागरे, भाऊसाहेब पारधे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पवार यांनी केले.

दरम्यान ​या सोहळ्याचे शिस्तबध्द नियोजन म्हैसगांव येथील शिवस्वराज्य मित्र मंडळाने केले होते. या सोहळ्यात गावातील युवक, महिला आणि जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वाच्या सामुदायिक प्रयत्नांमुळे यंदाची शिवजयंती म्हैसगांवच्या इतिहासात संस्मरणीय ठरली आहे. अशी माहिती पत्रकार कमलेश विधाटे यांनी कळविली आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !