डॉ. विश्‍वासराव आरोटे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर

संगमनेर Live
0
डॉ. विश्‍वासराव आरोटे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर

◻️ पत्रकारितेचा ‘विश्‍वास’ सार्थ ठरला! आरोटेवर, अभिनंदनाचा वर्षाव 


संगमनेर LIVE (नागपुर) | स्मॉल ॲन्ड मिडीयम न्यूज पेपर असोशियन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय संपादक एकदिवसीय खुले अधिवेशनात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई राज्य सरचिटणीस आणि संपादक डॉ. विश्‍वासराव आरोटे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पत्रकारिता क्षेत्रातील दीर्घकालीन, उल्लेखनीय व निष्ठापूर्ण योगदानाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न, घडामोडी व लोकहिताचे विषय सत्य, निष्पक्ष आणि निःस्वार्थपणे मांडण्याचे कार्य डॉ. विश्‍वासराव आरोटे यांनी सातत्याने केले आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविणे, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे तसेच जनजागृतीची प्रभावी भूमिका बजावणे या त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजात जागरूकता निर्माण झाली असून नव्या पिढीतील पत्रकारांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत.

हा सन्मान सोहळा शनिवार, दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी नगर भवन, हनुमान वॉर्ड, वरोरा, जि. चंद्रपूर येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास राज्यभरातील पत्रकार, संपादक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान या निवडीबद्दल संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तमराव वाडकर, राष्ट्रीय सचिव ईश्‍वरसिंह सेंगर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष योगेश तुरेराव, राज्य अध्यक्ष संतोष धरमकर, तसेच राज्य सचिव आशिष घुमे यांनी विश्‍वासराव आरोटे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. अशी माहिती पत्रकार संजय गोपाळे यांनी कळवली आहे‌.


Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !