सात्रळ येथे महाशिवरात्रीनिमित्त खिचडी प्रसादाचे वाटप
◻️ शिव मल्हार ग्रुप व किरण कडू पाटील मित्र मंडळाच्या स्तुत्य उपक्रम
संगमनेर LIVE (सात्रळ) | राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या मंगलमय आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या मंगल दिनाचे औचित्य साधून सात्रळ चौकात शिव मल्हार ग्रुप व किरण कडू पाटील मित्र मंडळाच्या वतीने खिचडी प्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.
रविवारी सकाळी कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत उत्साहात झाली. प्रारंभी भगवान महादेवांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते सामूहिक आरती करण्यात आली. आरतीनंतर ‘ओम नमः शिवाय’ आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषात प्रसाद वाटपास सुरुवात झाली. यावेळी प्रसाद घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
याप्रसंगी गणेश कारखान्याचे कार्यकारी संचालक जी. बी. शिंदे, सेवा सोसायटीचे चेअरमन दिनकर कडू यांच्यासह धोंडीराम जेजुरकर, सुभाष जगताप, चंद्रभान कडू, प्रा. कडू, अशोक पलघडमल, विजय पलघडमल, संभाजी कडू, उदयराज कडू, राजेंद्र कडू, रवी कडू, कैलास पलघडमल, विनोद पलघडमल, विलास बलसाने, शिराज तांबोळी, सुनील सात्रळकर, अरुण पलघडमल, दीपक पलघडमल, सौरभ वाकचौरे, चांगदेव पलघडमल, सोमनाथ जोर्वेकर, महेश भालेराव, गजू शेजवळ, सोमनाथ उचाडे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान शिव मल्हार ग्रुप आणि किरण कडू पाटील मित्र मंडळाने सामाजिक बांधीलकी जपत हा उपक्रम राबवला. सात्रळ परिसरातील शेकडो अबालवृद्धांनी या खिचडी प्रसादाचा लाभ घेतला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या उपक्रमाबद्दल संपूर्ण परिसरातून समाधान व्यक्त होत असून मंडळाच्या कार्यकर्त्याचे सर्वत्र विशेष कौतुक केले जात आहे. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.