सोनगाव येथे प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न!

संगमनेर Live
0
सोनगाव येथे प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न!

◻️​भक्तीचा सागर लोटला; महाप्रसादाने उत्सवाची सांगता

​सात्रळ LIVE (सात्रळ) | राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे यंदाचा श्रीराम नवमी उत्सव अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीराम मंदिर स्थापनेच्या परंपरेनुसार यावर्षीही गावकऱ्यांनी एकत्र येत या सोहळ्याचे नियोजन केले होते. 

या उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर श्रीराम मंदिर आणि श्री अमृतेश्‍वर मंदिरावर करण्यात आलेली भव्य विद्युत रोषणाई आणि आकर्षक पुष्पसजावट सर्वाचे लक्ष वेधून घेत होती. संपूर्ण मंदिर परिसर रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघाला होता, तर गाभाऱ्यात फुलांच्या सुंदर माळांची सजावट करण्यात आली होती.

​उत्सवाच्या मुख्य दिवशी प्रभू श्रीराम मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. यामध्ये शास्त्रोक्त पध्दतीने करण्यात आलेला अभिषेक, आरती आणि दिवसभर चाललेल्या भजन-कीर्तनाने वातावरणात चैतन्य निर्माण केले होते. दुपारी १२ वाजता श्रीरामांचा जन्म सोहळा आणि पाळणा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. 

या मंगलप्रसंगी ‘श्रीराम व अमृतेश्‍वर मंदिर, सोनगाव’ या डिजिटल बोर्डाचे अनावरण करण्यात आले. या डिजिटल बोर्ड विलासराव कुंडलिकराव पाटील अंत्रे यांनी दिला आहे. जन्मोत्सव सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

दरम्यान ​या संपूर्ण सोहळ्याचे यशस्वी नियोजन श्रीराम मंदिर समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी माजी सरपंच अशोक अंत्रे, श्रीराम मंदिर समितीचे अध्यक्ष लक्ष्मण अंत्रे, दिलीप अंत्रे, सुभाष शिंदे, सूर्यभान शिंदे, नारायण धनवट, विलास अंत्रे, ऋषि अंत्रे यांच्यासह अनेक स्वयंसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !