गॅस दरवाढीविरोधात संगमनेरमध्ये कॉग्रेसचा एल्गार!

संगमनेर Live
0
गॅस दरवाढीविरोधात संगमनेरमध्ये कॉग्रेसचा एल्गार!

◻️ हेच का तुमचे अच्छे दिन?- डॉ. जयश्री थोरात यांचा केंद्र सरकारला संतप्त सवाल


​संगमनेर LIVE | देशात निर्माण झालेली भीषण गॅस टंचाई आणि गगनाला भिडलेली दरवाढ याविरोधात संगमनेर तालुका काॅग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवक काॅग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य निदर्शन करण्यात आले. 

सध्या राज्यामध्ये महागाई आणि गॅस टंचाईने रौद्र रूप धारण केले असून, यामुळे गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत. या परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक विशेषतः महिला वर्ग प्रचंड अडचणीत आला असून, अनेक महाविद्यालयांतील हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याच्या जेवणाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. केंद्र सरकार केवळ घोषणाबाजी करण्यात धन्यता मानत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली भूमिका स्पष्ट करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा घणाघाती आरोप यावेळी आंदोलकांनी केला.

​आंदोलनावेळी बोलताना डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, “आज गॅस मिळवण्यासाठी सर्वसामान्यांना रांगांच्या रांगा लावाव्या लागत आहेत. काॅग्रेस सरकारच्या काळात अवघ्या साडेतीनशे रुपयांना मिळणारे सिलेंडर आज एक हजार रुपयांच्या पार गेले आहे. अमेरिका आणि आखाती देशांमधील युद्धाचे कारण पुढे करून सरकार आपली जबाबदारी झटकत असून महिलांमध्ये या धोरणांविरुद्ध मोठा आक्रोश आहे. हेच का तुमचे ‘अच्छे दिन’?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केंद्र सरकार हे गोरगरिबांच्या विरोधी असून त्यांनी तातडीने गॅसची उपलब्धता करून द्यावी आणि दरवाढ कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

​आंदोलनानंतर काॅग्रेस शिष्टमंडळाने प्रांताधिकारी अरुण उंडे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी अरुण उंडे यांनी जनतेच्या तीव्र भावनांची दखल घेत, सरकारकडे या विषयाचा तातडीने पाठपुरावा करून गॅस पुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन दिले.

दरम्यान ​या आंदोलनात संगमनेर शहर व तालुक्यातील काॅग्रेसचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !