शिर्डी मतदार संघातील रस्‍त्‍यांसाठी २२ कोटींचा निधी मंजुर - मंत्री विखे पाटील

संगमनेर Live
0
शिर्डी मतदार संघातील रस्‍त्‍यांसाठी २२ कोटींचा निधी मंजुर - मंत्री विखे पाटील 

◻️ तीन तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यांसह लोणी, आश्‍वी, सावळी विहिर, दाढ आदि गावांतील रस्त्याचा समावेश
 

संगमनेर LIVE (लोणी) | महायुती सरकारने नुकत्‍याच सादर केलेल्‍या अर्थसंकल्‍पात शिर्डी मतदार संघातील एकुण सात महत्‍वपूर्ण रस्‍त्‍यांच्‍या विकासासाठी २२ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला असल्‍याची माहीती जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.

संगमनेर, राहाता, कोपरगाव या तीन तालुक्‍यांना जोडणाऱ्या मुख्‍य मार्गाच्‍या विकासासाठी निधी मिळावा म्‍हणून शासनाकडे प्रस्‍ताव सादर करण्‍यात आले होते. प्रशासकीय स्‍तरावर या बाबतचा पाठपुरावा झाल्‍यामुळे सुमारे २६.९० कि.मी लांबीच्‍या रस्‍ते विकासासाठी २२ कोटी रुपये उपलब्‍ध झाले आहेत.

संगमनेर ते नेवासा या राज्‍य मार्गाच्‍या सुधारणे करीता व बंदीस्‍त गटारांच्‍या कामासाठी ३ कोटी ५० लाख रुपये मंजुर झाले आहेत. दाढ बुद्रूक - हसनापूर - लोणी - आडगाव - केलवड - नांदुर्खी या रसत्‍याच्‍या कामासाठी २ कोटी आणि पाथरे - लोणी बुद्रूक (म्‍हसोबा मंदिरा पाठीमागील) - पिंपरी निर्मळ - चोळकेवाडी या गावांच्‍या दळणवळणासाठी महत्‍वपूर्ण असलेल्‍या रस्‍त्‍याकरीता ६ कोटी दहा लाख रुपये निधीची तरतुद करण्‍यात आली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

शिर्डी विधानसभा मतदार संघात समाविष्‍ठ असलेल्‍या संगमनेर तालुक्‍यातील आश्‍वी खुर्द ते दाढ खुर्द या रस्‍त्‍याच्‍या मजबुतीकरणासाठी व डांबरीकरणासाठी ३ कोटी रुपये मंजुर झाल्‍याने या गावांच्‍या रस्‍त्‍यांनाही आता नाविन्‍यता मिळेल.

संगमनेर - जोर्वे - आश्‍वी - दाढ - कोल्‍हार या रस्‍त्‍याच्‍या कामालाही १ कोटी २० लाख रुपये मंजुर झाले आहेत. त्‍यामुळे संगमनेर, राहाता तालुक्‍याला जोडणाऱ्या सर्वच गावातील ग्रामस्‍थ, नागरीक, शेतकरी, विद्यार्थ्‍यासाठी हा मार्ग महत्‍वपूर्ण ठरणार आहे.

सावळीविहीर ते रांजणगाव देशमुख हा महत्‍वपूर्ण मार्ग विमानतळाकडून जात असल्‍याने या मार्गाच्‍या विकासासाठी महायुती सरकारने ५ कोटी रुपये उपलब्‍ध करुन दिले आहेत. कोल्‍हार बुद्रूक - राजुरी - गोल्‍हारवाडी - वाकडी - पुणतांबा या रस्‍त्‍यासाठी १ कोटी २० लाख रुपये उपलब्‍ध होणार असल्याने दळणवळणासाठी मोठा मार्ग भविष्‍यात निर्माण होईल.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !