तिर्थक्षेत्र विकासाला महायूती सरकारकडून मोठा निधी - सौ. शालिनीताई विखे

संगमनेर Live
0
तिर्थक्षेत्र विकासाला महायूती सरकारकडून मोठा निधी - सौ. शालिनीताई विखे

◻️ औरंगपूर आणि गोगलगांव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ!


संगमनेर LIVE (​लोणी) | शिर्डी मतदारसंघातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असून, यामुळे तीर्थक्षेत्रांच्या सर्वागीण विकासाला गती मिळून ग्रामीण भागात पर्यटनाच्या मोठ्या संधी निर्माण होतील, असा विश्‍वास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला. 

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील औरंगपूर व गोगलगाव येथे जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गोगलगाव रस्ता आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शनी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, तसेच नवीन विद्युत रोहीत्राच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सौ. विखे बोलत होत्या.

​यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना सौ. विखे यांनी नमूद केले की, पालकमंत्री विखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मतदारसंघात विकासाची गंगा वाहत असून दळणवळण सुलभ व्हावे हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील महायुती सरकारकडून निधीची उपलब्धता वेळेवर होत असल्याने आपला जिल्हा विकास प्रक्रियेत राज्यामध्ये अग्रस्थानी असल्याचे त्यांनी सांगितले. 

रस्त्यांच्या कामांसोबतच विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत शिर्डी मतदारसंघ अव्वल स्थानावर असून, या योजनांचा थेट लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहे. विकासकामे दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने व्हावीत यासाठी ग्रामस्थांनीही गावपातळीवर जागरूक राहून लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

​या कार्यक्रमाप्रसंगी राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विवेक गुंड, जनसेवा मंडळाचे अध्यक्ष विजयराव डेंगळे, लक्ष्मण चोपडे, इंद्रभान तांबे, रामप्रसाद मगर, गोगलगावचे सरपंच भाऊसाहेब खाडे, माणिक गोर्डे, त्र्यंबक गायकर, औरंगपूरच्या सरपंच लक्ष्मीबाई वाकचौरे, मिनाक्षी वदक, ज्ञानेश्वर तांबे, साहेबराव तांबे आणि बाळासाहेब गिरी यांसह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !