अंगणवाडी सेविका नव्या पिढीच्या खऱ्या शिल्पकार - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
अंगणवाडी सेविका नव्या पिढीच्या खऱ्या शिल्पकार - आमदार अमोल खताळ 

◻️ संगमनेर पंचायत समितीमध्ये ‘पोषण पंधरवाडा’ उत्साहात साजरा

◻️ अंगणवाड्यांना ‘अ‍ॅक्वा मशीन' देण्याचे दिले आश्‍वासन


संगमनेर LIVE |
“अंगणवाडी सेविका व मदतनीस या केवळ शासकीय कर्मचारी नसून त्या नव्या पिढीच्या जडणघडणीत आई-वडिलांनंतरचे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासात आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यात अंगणवाडी सेविकांचे योगदान मोलाचे आहे,” असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले. 

संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागाच्या वतीने आयोजित ‘पोषण पंधरवाडा’ सांगता समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

​यावेळी मार्गदर्शन करताना आमदार खताळ पुढे म्हणाले की, कुपोषण निर्मूलन, माता-बाल आरोग्य आणि बालकांचा सर्वागीण विकास ही आपली सर्वाची सामूहिक जबाबदारी आहे. अंगणवाडी सेविका या शासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत असून त्यांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून अंगणवाडी सेविकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण नेहमीच कटिबध्द राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

​आजच्या आधुनिक काळातील आव्हानांवर भाष्य करताना त्यांनी मुलांच्या मोबाईल व्यसनाबद्दल चिंता व्यक्त केली. आज अनेक पालक मुलांच्या हातात सहज मोबाईल देतात, ज्यामुळे त्यांच्या मानसिक आणि सामाजिक विकासावर विपरीत परिणाम होत आहेत. मुलांनी मोबाईलच्या आभासी जगातून बाहेर पडून खेळ, प्रयोग आणि सर्जनशील उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, यासाठी अंगणवाडी सेविकांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. मुलांच्या घडण्याच्या वयातच त्यांना योग्य संस्कार आणि ज्ञान देण्याची महत्त्वाची जबाबदारी अंगणवाडी सेविकांच्या खांद्यावर असल्याचे त्यांनी नमूद केले.

​कार्यक्रमाच्या उत्तरार्धात, तालुक्यातील अंगणवाड्यांना शुध्द पिण्याच्या पाण्यासाठी ‘अ‍ॅक्वा मशीन’ उपलब्ध करून देण्याची मागणी बालविकास प्रकल्प अधिकारी निलेश राऊत आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कामेश टावरे यांनी केली. या मागणीची तत्काळ दखल घेत आमदार खताळ यांनी आमदार निधी आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या सुविधा लवकरच उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्‍वासन दिले.

दरम्यान, ​या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी निलेश राऊत, आरोग्य समुपदेशक डॉ. प्रमोदिनी सावकार यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !