कृतिशील धम्म आचरणानेच समाज परिवर्तन शक्य - भंते संघरक्षीत
◻️ पिंप्री-लौकी अजमपूर येथील महिलांकडून भिक्खू संघाचे भव्य स्वागत
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील ‘दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ आयोजित बौध्दाचार्य श्रामणेर शिबिराच्या निमित्ताने आयोजित प्रबोधन सभेत ते बोलत होते.
भंते पुढे म्हणाले की, “केवळ सूत्रांचे पठण करून धम्म कळत नाही. जेव्हा आपण धम्मातील विचारांचे वैयक्तिक जीवनात प्रत्यक्ष अनुसरण करतो, तेव्हाच त्याचा खरा लाभ अनुभवता येतो. मी स्वतः हा अनुभव घेतला असून, आपणही या मार्गाने जाऊन धम्माचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा.” या प्रसंगी भंते संघरत्न आणि भंते कौंडिण्य यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
याच शिबिराच्या निमित्ताने पिंप्री-लौकी अजमपुर येथे महिलांनी एकत्रित येत भिक्खू संघासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामुळे महिलांमध्ये नवचैतन्य पहावयास मिळाले. शाखाध्यक्षा वंदना कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावातील क्षप्रमुख रस्त्यांवरून भिक्खू संघाची भव्य मिरवणूक काढली.
यावेळी चिमुकल्या मुलींनी मार्गावर पुष्पवृष्टी केली, तर महिलांनी भिक्खू संघाचे पाय धुवून स्वागत केले. महिलांनी कोणतेही कार्य हाती घेतले तर त्यात अपयश येत नाही, याची प्रचिती या उपक्रमातून आली.
दरम्यान, या शिबिर आणि प्रबोधन सभेला सरचिटणीस राजू मुन्तोडे, संस्कार सचिव अनिल मुन्तोडे, शाखाध्यक्ष दत्तराज मुन्तोडे, राजेंद्र मुन्तोडे, बबन मुन्तोडे, संस्कार सचिव सुशिल मुन्तोडे, सुधाकर मुन्तोडे, अमोल मुन्तोडे, सुरज मुन्तोडे, सिध्दार्थ मुन्तोडे, दिनेश मुन्तोडे, पुजा मुन्तोडे, साधना मुन्तोडे, वर्षा मुन्तोडे, अलका कदम, उज्वला मुन्तोडे, अलिशा मुन्तोडे, जया मुन्तोडे, रुपाली मुन्तोडे, कलाबाई मुन्तोडे, रेणुका मुन्तोडे, श्रेया मुन्तोडे, माया तांबे, अनिता माने, संगिता मुन्तोडे, रेखा मुन्तोडे, सुशिल मुन्तोडे, सुभजीत मुन्तोडे, वंदना कदम, माया कदम, मनिषा कदम, सुनिता कदम, आनिशा कदम, सविता कदम, विद्या कदम, वंदना कदम, निकिता कदम, कावेरी कदम, तनुजा कदम, मयुरी ब्राह्मणे, वैशाली कदम, ईश्वरी कदम, ज्ञानेश्वरी कदम, पूनम कदम आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.