महिला आरक्षण विधेयकाची विरोधकांकडून ‘हत्या’ - मंत्री विखे पाटील
◻️ जनजागृती मेळाव्यांतून काॅग्रेस-ठाकरे-पवार गटाचा बुरखा फाडणार
राज्यात महायुती सरकारने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण' योजनेला खोडा घालणारे आणि ही योजना बंद पाडण्यासाठी न्यायालयात धाव घेणारे हेच लोक असून, महिलांच्या हिताच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करणाऱ्या या नेत्यांकडून दुसरी कोणतीही अपेक्षा करता येणार नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि विरोधकांच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर ‘एक कोटी सह्यांची मोहीम’ राबवण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून विविध ठिकाणी मेळावे आयोजित करून काॅग्रेस, शरद पवार गट, उध्दव ठाकरे यांचा पक्ष, तसेच तृणमूल काॅग्रेस आणि द्रमुक यांसारख्या पक्षांनी कशा प्रकारे महिला आरक्षण विधेयकाची हत्या केली, हे जनतेला ठणकावून सांगितले जाईल. या जनजागृतीच्या माध्यमातून विरोधकांचा खरा चेहरा महिलांसमोर उघड करण्याचा निर्धार मंत्री विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
विरोधी पक्षांच्या दुटप्पी भूमिकेचा समाचार घेताना विखे पाटील यांनी आठवण करून दिली की, २०२३ साली याच पक्षांनी महिला आरक्षण विधेयक मतदारसंघाची पुनर्रचना आणि जनगणनेप्रमाणे लागू करण्यास संमती दिली होती. मात्र, आज जेव्हा दोन तृतीयांश बहुमताचा पेच समोर आला आहे, तेव्हा राजकीय फायद्यासाठी या पक्षांनी आपली भूमिका बदलली आहे. महिलांना त्यांचे घटनात्मक हक्क मिळवून देण्याऐवजी केवळ राजकारण करणाऱ्या या प्रवृत्तींना जनता आगामी काळात निश्चितच धडा शिकवेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.