बाभळेश्‍वर येथे ‘शेळीपालन व्यावसायिक प्रशिक्षणा’चे आयोजन

संगमनेर Live
0
बाभळेश्‍वर येथे ‘शेळीपालन व्यावसायिक प्रशिक्षणा’चे आयोजन

◻️ ​कृषि विज्ञान केंद्राचा उपक्रम; युवक-युवतींना शेळीपालनातून स्वावलंबी बनविण्याचा मानस


संगमनेर LIVE (​लोणी) |
ग्रामीण भागातील युवक-युवतींना शेतीपूरक व्यवसायाची जोड देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी पायरेन्सच्या कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्‍वर येथे दोन दिवसीय ‘आधुनिक शेळीपालन’ व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण मंगळवार, दिनांक ५ मे पासून सुरू होणार असल्याची माहिती केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांनी दिली आहे. 

‘कृषि उद्योजकता अभियान’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. उत्तमराव कदम आणि पायरेन्सचे सचिव डॉ. निलेश बनकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.

​या दोन दिवसांच्या सखोल प्रशिक्षण कार्यक्रमात शेळीपालनाशी संबंधित सर्व तांत्रिक आणि व्यावसायिक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने शेळ्यांच्या विविध जातींची निवड, शास्त्रीय पद्धतीने चारा व्यवस्थापन, आरोग्य संगोपन, रोग व आजार नियंत्रण आणि वेळोवेळी करावयाचे लसीकरण या विषयांचा समावेश असेल. 

तसेच आधुनिक शेड उभारणीचे तंत्र, व्यवसायासाठी आवश्यक असणारा प्रकल्प आराखडा तयार करणे, मार्केटिंगची कौशल्ये आणि बॅकिंग क्षेत्राशी संबंधित विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली जाईल. प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ थिअरीवर भर न देता प्रत्यक्ष प्रक्षेत्र भेटीद्वारे युवक-युवतींना प्रत्यक्ष अनुभवातून मार्गदर्शन केले जाणार आहे.

​हे प्रशिक्षण व्यावसायिक स्वरूपाचे असून केवळ ३० प्रशिक्षणार्थ्यासाठी जागा मर्यादित ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे इच्छुक आणि गरजू युवक-युवतींनी नावनोंदणीसाठी 8208642899 या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा थेट कृषी विज्ञान केंद्राशी तात्काळ संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !