लोणी येथे बी. व्होक इन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अभ्यासक्रम सुरू

संगमनेर Live
0

लोणी येथे बी. व्होक इन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अभ्यासक्रम सुरू

◻️ ​कौशल्याधारित शिक्षणावर भर; विद्यार्थ्याना नोकरी आणि स्वयंरोजगाराची संधी

संगमनेर LIVE (​लोणी) | सध्याच्या डिजिटल युगात केवळ पदवीपेक्षा कौशल्यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. १२ वी नंतर काय? या विद्यार्थ्याच्या याच गरजा ओळखून लोणी येथे ‘बी. व्होक इन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट' हा नाविन्यपूर्ण आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत डिझाइन केलेला हा अभ्यासक्रम विद्यार्थ्याना थेट उद्योग क्षेत्राशी जोडणारा आहे. अशी माहिती पायरेन्सचे संचालक डॉ. मोहसीन तांबोळी यांनी दिली.

​संस्थेच्या माध्यमातून कौशल्य आधारित शिक्षण, प्रक्षेत्र भेटी आणि प्रत्यक्ष कृतीतून शिक्षणावर विशेष भर दिला जात आहे. या अभ्यासक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे केवळ सैध्दांतिक ज्ञान दिले जात नाही, तर विद्यार्थ्याना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, वेब डेव्हलपमेंट, मोबाईल ॲप डेव्हलपमेंट, पायथन आणि डेटाबेस व्यवस्थापन यांसारखी आधुनिक कौशल्ये शिकवली जातात, ज्यामुळे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थी उद्योग क्षेत्रासाठी पूर्णपणे सक्षम बनतात.

​या अभ्यासक्रमाची रचना विद्यार्थ्याच्या सोयीनुसार करण्यात आली असून, प्रत्येक शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतंत्र प्रमाणपत्र दिले जाते. पहिल्या वर्षानंतर डिप्लोमा, दुसऱ्या वर्षानंतर ॲडव्हान्स्ड डिप्लोमा आणि तिसऱ्या वर्षानंतर पदवी प्रदान केली जाते. यामुळे विद्यार्थ्याना त्यांच्या शिक्षणासोबतच रोजगाराच्या संधीही टप्प्याटप्प्याने उपलब्ध होतात.

​संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, अण्णासाहेब म्हस्के, सौ. शालिनीताई विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थेचे सचिव डॉ. निलेश बनकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम साकारला आहे. आजची गरज केवळ पदवी मिळवण्याची नसून स्वतःमध्ये कौशल्य विकसित करण्याची असल्याचे सांगत, विद्यार्थ्यानी प्रवाहामागे न धावता स्वतःच्या आवडीनुसार करिअरची निवड करण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. 

दरम्यान, या अभ्यासक्रमामुळे स्थानिक विद्यार्थ्याना तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी आणि स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !