प्रवरेच्या दोन विद्यार्थ्याची राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी निवड

संगमनेर Live
0
प्रवरेच्या दोन विद्यार्थ्याची राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी निवड

◻️ ​दाढ बुद्रुक येथील विद्यार्थ्याची तेलंगणा येथील स्पर्धेसाठी निवड

संगमनेर LIVE (​लोणी) | ​लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या दाढ बुद्रुक (ता. राहाता) येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालय, प्राथमिक विभाग व कनिष्ठ महाविद्यालयातील दोन गुणवंत विद्यार्थ्यांची राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अशी माहिती प्राचार्य दीपक डेंगळे यांनी दिली.

​तेलंगणा येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी विद्यालयातील सूरज सोमनाथ पवार आणि कु. ऋतुजा रामनाथ पांळदे या दोन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यालयाचे नाव राज्यपातळीवर उंचावले असून, परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

या खेळाडूंना क्रीडा संचालक दादासाहेब तुपे आणि नितीन साबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही विशेष प्रशिक्षण आणि आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली विद्यार्थी शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा क्षेत्रातही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत आहेत.

दरम्यान, विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, सौ. शालिनीताई विखे, डॉ. सुजय विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, भारत घोगरे, डॉ. शिवानंद हिरेमठ, डॉ. प्रदीप दिघे, सौ. लीलावती सरोदे यांच्यासह स्थानिक स्कूल कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !