भीषण ट्रॅक्टर अपघातात मामासह दोन भाच्यांचा दुर्दैवी मृत्यू

संगमनेर Live
0
भीषण ट्रॅक्टर अपघातात मामासह दोन भाच्यांचा दुर्दैवी मृत्यू

◻️ नेवासे तालुक्यातील ​सोनई व खरवंडी परिसरात शोककळा

संगमनेर LIVE (​नेवासे) | नेवासे तालुक्यातील खरवंडी येथे मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण ट्रॅक्टर अपघातात सोनई येथील दोन अल्पवयीन सख्ख्या भावांचा आणि त्यांच्या मामाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सोनई व खरवंडी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

प्रसिध्दी माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, सोनई येथील शेतकरी गणेश दरंदले यांची मुले अभिषेक गणेश दरंदले (वय १६) आणि विजय गणेश दरंदले (वय १४) हे शाळेला सुट्टी असल्याने मंगळवारी सकाळी खरवंडी येथील त्यांचे मामा रामेश्‍वर बाळासाहेब मराठे यांच्याकडे गेले होते. सायंकाळच्या सुमारास खरवंडी परिसरात ट्रॅक्टर पलटी झाल्याने हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत तिघेही ट्रॅक्टरखाली चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ट्रॅक्टर सरळ करून तिघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि तिघांचाही दुर्दैवी अंत झाला होता.

नेवासा येथे शवविच्छेदनानंतर मंगळवारी सायंकाळी रामेश्‍वर मराठे यांच्यावर खरवंडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर बुधवारी सकाळी अभिषेक आणि विजय दरंदले या दोन्ही सख्ख्या भावांवर सोनई येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

दरम्यान, या घटनेमुळे दरंदले आणि मराठे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरातून मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !