नगरचा पीएसआय एक लाखाच्या लाचे प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात

संगमनेर Live
0
नगरचा पीएसआय एक लाखाच्या लाचे प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात 

◻️ ​गुन्ह्यातील तपासात मदतीसाठी दोन लाखांची लाच मागितली

संगमनेर LIVE (​अहिल्यानगर) | नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने एका गुन्ह्यातील मदतीच्या बदल्यात एक लाख रुपयांच्या लाचे प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. जयेश मोतीलाल गांगुर्डे असे ताब्यात घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदाराचे मामा आणि इतर १५ नातेवाईकांविरोधात नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करत होते. या तपासामध्ये मदत करण्याच्या मोबदल्यात गांगुर्डे यांनी तब्बल दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. या मागणीनंतर तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर यांच्याकडे १८ मे २०२६ रोजी धाव घेत तक्रार नोंदवली होती.

यानंतर ​लोकसेवक गांगुर्डे यांनी तडजोडीअंती एक लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली असता, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, पोलीस नाईक चंद्रकांत काळे, पोलीस कॉन्स्टेबल किशोर कुळधर आणि शेखर वाघ यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक सनिल दोरगे आणि पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपूटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तर, ​या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे करत असून, या घटनेमुळे पोलीस दलातील भ्रष्ट कारभारावर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

दरम्यान, सध्या तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !